औरंगाबाद : (सलमान शेख) मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने (टीईटी) शिक्षक पात्रता परीक्षेला आव्हान देणाऱ्या तसेच उत्तीर्ण होण्यासाठी मुदतवाढ मागणी करणाऱ्या 89 याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती एस.व्ही. गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती यांनी फेटाळल्या. त्यामुळे टीईटी उत्तीर्ण असलेले शिक्षण अपात्र ठरणार आहे.
भारत शिक्षणहक्क कायद्यानुसार टीईटी देने बंधनकारक आहे. त्यामुळे टीईटी न दिलेल्या शिक्षकांना 31 मार्च 2019 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र ही मुदत संपल्यानंतरही आणखी मुदतवाढ द्यावी यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. विशेष म्हणजे राज्य सरकारने देखील टीईटीसाठी मुदतवाढ दिली होती मात्र, त्याची मुदत देखील 31 मार्च 2019 पर्यंत देण्यात आली होती.
यानंतर राज्य सरकारकडून कोणतीही मुदतवाढ मिळणार नाही असे स्पष्ट करण्यात आले होते. व आदेशही काढण्यात आले होते. त्यामुळे या निर्णयातुन नाराज झालेल्या शिक्षकांनी उच्च न्यायालयात मुदतवाढ मिळावी यासाठी धाव घेतली होती. याप्रकरणाची सुनावणी 23 एप्रिल 2021 ला पूर्ण झाल्यानंतर निकाल राखून ठेवण्यात आला होता. अखेर न्यायालयाने 11 जून 2021 ला आपला निकाल दिला असून, त्यात टीईटी मुदतवाढ याचिका फेटाळून लावण्यात आली आहे.