banner 728x90

अजित पवारांच्या अडचणीत वाढ; ईडीकडून 65 कोटींची मालमत्ता जप्त

banner 468x60

Share This:

मुंबई : सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून अवैध रीतीने खरेदी करणे आणि मनी लाँडरिंग, अशा आरोपांवरून अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवारी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा यांच्याशी संबंधित जरंडेश्वर शुगर मिल्स या खासगी कंपनीची सुमारे 65 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली.

दोन दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘अजित पवार यांच्यावरही कारवाई होणार,’ असे विधान केले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकारण पुन्हा पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतील (पीएमएलए) फौजदारी कलमांन्वये चिमणगाव (ता. कोरेगाव) येथील जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची जमीन, इमारत, कारखान्याचा प्रकल्प आणि यंत्रसामग्री जप्त करण्याचा हंगामी आदेश ‘ईडी’ने काढला आहे. 
या सर्व मालमत्तेचे एकूण मूल्य 65.75 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जात आहे. संबंधित कारखान्याचा व्यवहार हा 2010 साली झाला होता. पूर्वी हा कारखाना कोरेगावच्या माजी आमदार शालिनीताई पाटील यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाकडे होता. राज्य सहकारी बँकेने थकीत कर्जापोटी या कारखान्याचा लिलाव केला. ‘कारखान्याची आर्थिक स्थिती ढासळल्यानंतर तो गुरू कमॉडिटी सर्व्हिस लिमिटेडने लिलावात खरेदी केला. त्यांनी तो जरंडेश्वर शुगर मिल्स प्रायव्हेट लिमिटेड या खासगी कंपनीला भाडेतत्त्वावर चालविण्यासाठी दिला. या कंपनीचे सर्वाधिक समभाग स्पार्कलिंग सॉइल प्रा. लि. या कंपनीकडे होते. ही कंपनी अजित पवार यांच्याशी संबंधित असल्याचे केलेल्या तपासात आढळले,’ असे ‘ईडी’ने निवेदनात म्हटले आहे.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!