नेवासे- अल्पवयीन मुलीस फुस लावून पळवून नेवून तिच्यावर अत्याचार करणा-या आरोपीस नेवासे येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने तेरा वर्ष सक्तमजूरी व पंधरा हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.
मुक्तार रज्जाक शेख (वय २५, रा. महालक्ष्मी हिवरे ता. नेवासे) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना २०१८ मध्ये घडली होती. याबाबत माहिती अशी, दहावीत शिक्षण घेत असलेल्या एका अल्पवयीन मुलगी आपल्या शाळेत जात असतांना मध्ये आरोपी शेख याने त्याच्या इंडिका कार मध्ये तिच्या मागेमागे आला व मुलीला प्रेमाचे व लग्नाचे आमिष दाखवून तीला इंडिकात बळजबरीने बसवून फूस लावून पळून नेत त्या अल्पक्यीन मुलीला पैठण, जालना, पुणे, रायपुर, छत्तीसगड, पिंपरी खालसा ता. लोणार, कृष्णपुरी तांडा, ता. चाळीसगाव, रायपुर अशा वेगवेगळया ठिकाणी नेवून तिच्यावर शारीरीक अत्याचार केले.
दरम्यान पोलीस व फिर्यादी पिडीतेचे नातेवाईकांनी आरोपीचा शोध घेतला असता घटनेनंतर सुमारे एक महिष्याने सदर अल्पवयीन मुलगी हि आरोपीच्या ताब्यामध्ये रायपुर येथे मिळून आली होती .
या प्रकरणी सोनई (ता. नेवासे) पोलिसांत शेख यांच्या विरोधात बालकांचे लैगिंक अत्याचारांपासून संरक्षण कायदासह विविधी कलमा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी नेवासे येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एम. तापकिरे यांच्यासमोर सुनावणी झाली असतात त्यांनी आरोपीला तेरा वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील ऍड. देवा काळे यांनी काम पाहिले.