अहमदनगर : जिल्ह्यात आज ५७५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १६ हजार २११ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे ८० टक्क्यांहून अधिक असून ते आता ८३.१५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरुवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ८८ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३०१३ इतकी झाली आहे.
बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ४६, राहाता ०६, नगर ग्रामीण ०८, कॅंटोन्मेंट ०१, नेवासा ०१, पारनेर ०७, राहुरी ११, शेवगाव ०१, कोपरगाव ०३, जामखेड ०२, मिलिटरी हॉस्पीटल ०१ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज ५७५ रुग्णांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये, मनपा २२५, संगमनेर २३, राहाता २९, पाथर्डी २२, नगर ग्रा. ४९, श्रीरामपूर ३०, कॅन्टोन्मेंट १५, नेवासा १९, श्रीगोंदा २५, पारनेर २६, अकोले १७, राहुरी २०, शेवगाव १३, कोपरगाव २८, जामखेड २२, कर्जत ०४, मिलिटरी हॉस्पीटल ०७ अशा रुग्णांचा समावेश आहे.
*बरे झालेली रुग्ण संख्या: १६२११*
*उपचार सुरू असलेले रूग्ण:३०१३*