banner 728x90

आता तृतीयपंथी समाजही सुशिक्षित होणार; वसईत सुरू करण्यात आलं राज्यातील पाहिलं ‘किन्नर विद्यालय’

banner 468x60

Share This:

पालघर : योगेश चांदेकर – बालपणीच्या निरागस जगण्याचे वर्णन करताना ‘बालपणीचा काळ सुखाचा’, ‘बालपण देगा देवा..’ असं जरी आपण म्हणत असलो तरी सर्वच मुलांच्या वाट्याला आलेलं बालपण हे सुखाचं नसतं. त्यातील एक म्हणजे ‘तृतीयपंथी’ 

तृतीयपंथी समाजातील लोकांना मोठ्या प्रमाणात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. हे आपण पाहतोच. गेल्या कित्येक वर्षांपासून आपल्याला समाजात स्थान मिळावे यासाठी या तृतीयपंथ्यांचा संघर्ष सुरूच आहे. त्यांना अद्याप समाजाने स्थान दिलेले नाही. त्यांना प्रत्येक ठिकाणी भेदभाव आणि वेगळ्या नजरेने पाहिल्या जाते. मग तो माणूस असो महिला वर्ग दोन्हीही या तृतीयपंथ्यांना एक वेगळ्या दृष्टिकोनातून बघतात. त्यांना कमी समजले जाते. 
त्यामुळे या समाजातील लोकांना शिक्षणाचा सुद्धा अधिकार मिळत नाही. त्यामुळे समाजातील नागरिक शिक्षणाच्या हक्कापासून वंचित राहतात. जर एखाद्या ठिकाणी शाळेत प्रवेश मिळालाही तर त्यांना समाजाशी संघर्ष करावा लागतो.
मात्र आता तृतीयपंथी हा समाजात मोठ्या प्रमाणात बदल घडत आहेत. आणि प्रत्येक क्षेत्रात हा समाज आपली महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडत आहे. मागच्या वर्षी देशात कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. त्यात प्रत्येकाला आपापला जीव वाचवण्याचं पडलं होतं. अनेक ठिकाणी आपलं पाहिलं की कोरोनाच्या धाकाने मुलाने आपल्या बापाचं अंतिमसंस्कार केले नाही. तर अनेक ठिकाणी गरीब कामगार व वर्ग पैशासाठी हताश झाला होता. त्यांना निःसंकोचपणे होईल ती मदत या तृतीयपंथी समाजाने केली आहे. असे असताना, समाजात आपल्याला स्थान मिळावे यासाठी अजूनही यांचा संघर्ष सुरूच आहे.
मात्र आता या समाजाने एक पाऊल पुढे टाकले आहे. तृतीयपंथी समाज हा सुशिक्षित व्हावा यासाठी या समाजातर्फे आता शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यातील वसई या भागात राज्यातील पहिली तृतीयपंथ्यांच्या शिक्षणासाठी ट्रांसजेंडर शाळा सुरू करण्यात आली आहे.
या समाजाबद्दल इतर समाजात पसरलेल्या भेदभाव दूर करण्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेची सुरुवात मेहंदी अली आणि श्री महाशक्ती चॅरिटेबल ट्रस्टच्या रेखा त्रिपाठी यांनी केली आहे. या शाळेला ‘किन्नर विद्यालय’ असे नाव देण्यात आले असून, आतापर्यंत 24 विद्यार्थ्यांनी यात प्रवेश घेतला आहे. सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद आहेत. मात्र शाळा सुरू होण्याचे आदेश मिळाल्यानंतर येथेही विद्यार्थ्यांना शिकावयास सुरुवात होणार आहे. विशेष म्हणजे या शाळेत शिकणारे सर्व शिक्षक हे सुद्धा  तृतीयपंथीच आहे.
ही शाळा सुरू झाल्याने या समाजातील लोकांना रोजगार सुद्धा उपलब्ध होऊ शकणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात ही पहिलीच शाळा असेल जिथे तृतीयपंथ्यांना शिक्षण दिले जाणार आहे. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे, या शाळेत शिक्षक देखील याच समाजाचे असून मोठ्या प्रमाणात सुशिक्षित आहेत. त्यामुळे आता या समाजातील लोकांना शिक्षण घेता येणार ही एक सकारात्मक बाब आहे.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!