banner 728x90

आमच्या पक्षातही अनेक भास्कर जाधव आहेत – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

banner 468x60

Share This:

अहमदनगर : मला विधानसभा अध्यक्ष होण्यास काहीच हरकत नाही. असे विधान भास्कर जाधव यांनी केले होते. विधानसभा अध्यक्ष काँग्रेस पक्षाचाच होणार यावर बाळासाहेब थोरातांनी आपली ठाम भूमिका मांडली होती. मात्र, शिवसेनेकडे असलेले मंत्रीपद शिवसेनेकडे राहून मला विधानसभा अध्यक्ष पद मिळाले तर त्याचा मला आनंद होईल. विधानसभा अध्यक्षपद शिवसेनेकडे द्यावं, अशी महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे आणि त्यांचं माझ्या नावावर एकमत झाल्याचं देखील मला समजलं आहे, असं भास्कर जाधव यांनी म्हटलं होतं. यावर काँग्रेसचे नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आमच्याकडेही अनेक भास्कर जाधव आहेत, असं मत व्यक्त करून विधानसभेचे अध्यक्षपद हे काँग्रेसकडेच राहणार असल्याची ठाम भूमिका महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी घेतली आहे.
महाराष्ट्र विधीमंडळाचं दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन पार पडलं. या अधिवेशनादरम्यान तालिका अध्यक्ष म्हणून शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी उत्तम कामगिरी बजावली. पण म्हणून हे पद शिवसेनेला देण्यासंबंधित कोणताही विचार नाही किंवा चर्चाही नाही, असं बाळासाहेब थोरातांनी म्हटलंय.
आमच्या पक्षात सक्षमपणे काम करु शकणारे नेते आहेत. या अधिवेशनात अध्यक्षपदाची निवड होऊ शकलेली नाही. यासाठी बरीच मोठी प्रक्रिया आहे. कोरोनाचं वातावरण निवळल्यानंतर ही निवडणूक घ्यावी लागणार आहे, असंही थोरात म्हणाले.
दरम्यान, यंदाचं विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन महाविकास आघाडी सरकारने दोनच दिवसात गुंडाळले. यात मोठ्या प्रमाणात गदारोळ सुद्धा पाहायला मिळाला. तालिका अध्यक्ष म्हणून भूमिका बजावलेल्या भास्कर जाधवांनी भाजपचे 12 आमदार निलंबित केले आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!