मुंबई : यंदाच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशानंतर राज्यातील वातावरण चांगलच तापलं आहे. राज्यातील विरोधी पक्षनेते आणि सत्ताधारी पक्षनेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाची खेळी चांगली रंगलेली पाहायला मिळत आहे. तसेच शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखात विरोधकांवर आरोप करण्यात येत आहे. याच आरोपांवर भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी वक्तव्य केलं आहे.
उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाच्या सुविधांचा उपभोग घ्यायचा आहे – आमदार गोपीचंद पडळकर
गोपीचंद पडळकर यांनी ट्विट केले असून, त्यामध्ये त्यांनी राऊतांनी सामनाच्या अग्रलेखात मुळात त्यांना 12 आमदारांचं शल्य बोचतंय, हा कबूली जबाबच नोंदवला. परंतू एमपीएससीचा विद्यार्थी स्वप्नील लोणकर, नाभिक समाजातील गजानन कडू वाघ, कोविड योद्धा डॉ. गणेश शेळके यांना ठाकरे सरकारच्या भोंगळ कारभारामुळे आपली जीवन यात्रा संपवावी लागली असल्याचं म्हटलं आहे.
या सगळ्याविषयी खरंतर ठाकरे सरकारला काहीच देणंघेणं नाहीये. फक्त मुख्यमंत्रीपदाच्या सुविधांचा उपभोग घ्यायचा आहे, पण जबाबदारीपासून मात्र पळ काढायचा असल्याचं म्हणतच गोपीचंद पडळकरांनी ठाकरे सरकारवर आणि अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंवर चांगलाच निशाणा साधला आहे.
Recommendation for You

Post Views : 55 पालघर- वसई-विरार चे प्रथम महापौर, ज्येष्ठ समाजसेवक, उद्योजक, ख्यातनाम बांधकाम व्यावसायिक…

Post Views : 55 पालघर-योगेश चांदेकर पालघरः पालघर जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपचे जिल्हाध्यक्ष…

Post Views : 55 पालघर-योगेश चांदेकर पालघरः डहाणू नगरपालिकेच्या नगराध्यक्ष आणि २७ नगरसेवकांच्या निवडणुकीसाठी भारतीय…

Post Views : 55 जिल्ह्यात सुरू असलेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकीदरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी पालघर…












