मुंबई : भोसरी एमआयडीसीतील जमीन गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई गिरीष चौधरी यांना ईडीने अटक केली होती. मंगळवारी 13 तास कसून चौकशी केल्यानंतर गिरीश चौधरींना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर एकनाथ खडसे यांना देखील गुरुवारी ईडीने नोटीस पाठवली होती. त्यानंतर त्यांनी ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजेरी लावली होती.
एकनाथ खडसेंची ईडीकडून तब्बल 9 तास चौकशी; चौकशीला खडसेंचा सकारात्मक प्रतिसाद
ईडीने चौकशीला बोलावल्यानंतर एकनाथ खडसे यांची ईडीने गुरुवारी तब्बल नऊ तास कसून चौकशी केली आहे. सकाळी अकराला एकनाथ खडसे ईडी कार्यालयात आले होते. त्यानंतर खडसे रात्री आठ वाजता ईडी कार्यालयातून बाहेर पडले. या 9 तासात भोसरी भूखंड खरेदी विषयासंदर्भात अनेक प्रश्न खडसेंना विचारले गेल्याची माहिती समोर आली आहे.
तर ईडीच्या चौकशीला त्यांनी पुर्ण सहकार्य केल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी दिली आहे. चौकशीत संपत्तीची संपूर्ण चौकशी करण्यात आली आहे. ईडीने स्टेटमेंटसची सत्यता तपासली असून, याशिवाय ईडीला जे कागदपत्रे हवी होती ती सगळी दिली आहेत. ईडीला आणखी काही कागदपत्रे हवी होती ती कागदपत्रे 10 दिवसात जमा करण्यास सांगितलं आहे. ईडीला जेव्हा चौकशीसाठी आमची गरज लागेल तेव्हा तेव्हा आम्ही यायला तयार आहोत, असेही एकनाथ खडसे यांनी सांगितलं आहे.
ईडीने पैशांच्या व्यवहाराबाबत, ताईच भोसरीतील जमिनीबाबतही चौकशी केली. याची सविस्तर माहिती खडसे यांनी दिली आहे, असं खडसेंच्या वकिलांनी सांगितलं आहे. भोसरी एमआयडीसीतील सर्व्हे नंबर 52 मधील तीन एकर जमीन खडसेंच्या पत्नी आणि जावई यांनी अब्बास उकानी या व्यक्तींकडून 3 कोटी 75 लाख रूपयांना खरेदी केली होती.
Recommendation for You

Post Views : 49 पालघर- वसई-विरार चे प्रथम महापौर, ज्येष्ठ समाजसेवक, उद्योजक, ख्यातनाम बांधकाम व्यावसायिक…

Post Views : 49 पालघर-योगेश चांदेकर पालघरः पालघर जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपचे जिल्हाध्यक्ष…

Post Views : 49 पालघर-योगेश चांदेकर पालघरः डहाणू नगरपालिकेच्या नगराध्यक्ष आणि २७ नगरसेवकांच्या निवडणुकीसाठी भारतीय…

Post Views : 49 जिल्ह्यात सुरू असलेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकीदरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी पालघर…












