गंगापूर : सलमान शेख – स्थानिक स्वराज्य संस्थामधील ओबीसी आरक्षण रद्द झाल्याचा निषेधार्थ भाजपच्या वतीने गंगापूर तालुक्यातील कायगाव टोका या पुलावर चक्काजाम आंदोलन करण्यात आला. या आंदोलनात ग्रामीण भागातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आंदोलकांनी औरंगाबाद-पुणे महामार्ग सुमारे एक तास बंद ठेऊन निषेध केला. गंगापूरचे भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रशांत बंब यासह मनसेचे नेते, कार्यकर्ते यांनी रास्तारोको केला.