औरंगाबाद : सलमान शेख – औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचा वेग मंदावला आहे. ही एक दिलासादायक बाब म्हणावी लागेल. गेल्या 24 तासात जिल्ह्यात फक्त 54 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यात शहरातील 20 तर ग्रामीण भागातील 34 रुग्णांचा समावेश आहे. तर गेल्या 24 तासात 4 जणांचा मृत्यू झाला आहे. 4 मार्चनंतर पहिल्यांदा ग्रामीण भागातील रुग्णसंख्या ही 50 च्या खाली आली आहे. काल दिवसभरात 74 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यातील 1 लाख 41 हजार 146 रुग्ण कोरोनातून बरे झाले असून, ते सुखरूप घरी परतले आहे. जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 1 लाख 45 हजार 530 एवढा झाला आहे. तर 3 हजार 391 जणांचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यातील विविध भागात 993 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.