banner 728x90

औरंगाबाद जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू, बळीराजा सुखावला

banner 468x60

Share This:

औरंगाबाद : सलमान शेख – गेल्या अनेक दिवसांपासून दांडी मारलेल्या पावसाने औरंगाबाद जिल्ह्यासह मराठवाड्यातही हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात सुरुवातीला पाऊस झाला त्यात बऱ्याच जणांनी पिकांची लागवड केली होती. मात्र पावसाने उघडीप दिल्याने जिल्ह्यातील अनेक भागात पीक वाळत चालली होती. त्यामुळे शेतकरी वर्ग मोठा प्रमाणात नाराज झाला होता. मात्र आज दुपारपासूनच जिल्ह्यात सर्वदूर पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांच्या मनात आनंद निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी कापसाच्या लागवडी झाल्या नव्हत्या. मात्र आता पावसाने चांगला जोर धरल्याने उरेल-सुरेल लागवडीलाही जोर येणार आहे. आज सकाळपासूनच कडक ऊन आणि उकाड्यामुळे नागरिक त्रस्त होते. त्यात आज पावसाने चांगली हजेरी लावल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. 

गंगापूर तालुक्यातही दुपारी 3 वाजेपासून पावसाची विजांच्या कडकडाटासह जोरदार बॅटिंग सुरू आहे. तालुक्यातील अगर कानडगाव, ममदापूर, बगडी, जामगाव यासह संपुर्ण तालुक्यात जोरदार सरी बरसल्या आहे. 
गेल्या पंधरवड्यापासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्याच्या चिंतेत वाढ झाली होती. पैठण तालुक्यातील अनेक गावात दुबारपेरणीचे संकट निर्माण झाले होते. मात्र आता पावसाने ऐनवेळी साथ दिल्याने शेतकऱ्याच्या मनात आनंद निर्माण झाला आहे. दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी वरुणराजाने बळीराजाला साथ द्यावी हीच लक्षवेधी न्युज कडून प्रार्थना.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!