औरंगाबाद : सलमान शेख – औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना पाठोपाठ म्युकरमायक्रोसिस रुग्णांचा आकडा वाढतच चालला आहे. ही एक चिंतेची बाब आहे. जिल्ह्यात रविवारी या आजाराने दोन जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे बळींची संख्या ही 123 इतकी झाली आहे. शनिवारी 10 तर रविवारी एक नवीन रुग्ण दाखल झाल्याने रुग्णांचा आकडा हा 1 हजार 31 इतका झाला आहे. जिल्ह्यात गेल्या 2 महिन्यांनापासून म्युकरमायक्रोसिस रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. शहर, ग्रामीण तसेच मराठवाड्याच्या इतर जिल्ह्यातून रुग्ण उपचारासाठी औरंगाबादेत येत आहेत.शहरातील रुग्णसंख्या कमी असली तरी, ग्रामीण आणि इतर जिल्ह्यातून येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. सध्या या आजाराचे 245 रुग्णांवर उपचार सुरु आहे. तर 663 जण या आजारातून बरे झाले असून त्यांना सुट्टी देण्यात आली आहे.