नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना आता उधाण आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे संघटन महामंत्री बी. एल. संतोष यांच्यासोबत बैठक घेतली असून, या बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराला अंतिम स्वरुप देण्यात आलं आहे. मोदींच्या निवासस्थानी ही मंत्रिमंडळ विस्ताराची बैठक पार पडली. यामुळे मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Home
पालघर
कॅबिनेट मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच; महाराष्ट्रातून नारायण राणे आणि हिना गावित यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता
कॅबिनेट मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच; महाराष्ट्रातून नारायण राणे आणि हिना गावित यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता
केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार हा बुधवारी होण्याची शक्यता असम, बुधवारीच मंत्र्यांचा शपथविधी पार पडले जाईल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. मात्र याबाबत अद्याप कोणत्याही प्रकारची घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात आलेली नाही. मंत्रिमंडळ विस्तार झाल्यास मे 2019 मध्ये दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यावर पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळाचा हा पहिला विस्तार असणार आहे. आसामचे माजी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल, ज्योतिरादित्य शिंदे आणि सुशील मोदी यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. तसेच महाराष्ट्रातील भाजपचे खासदार नारायण राणे आणि हिना गावीत यांचीही नावं चर्चेत असल्याची माहिती मिळत आहे.
उत्तर प्रदेशात पुढच्या वर्षी विधानसभा निवडणूक होणार असून, केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात उत्तर प्रदेशवर विशेष लक्ष दिलं जाण्याची शक्यता आहे. राजकीयदृष्ट्या उत्तर प्रदेश हे सर्वाधिक महत्त्वाचे राज्य आहे. मंत्रिमंडळ विस्तारात पश्चिम बंगालचं प्रतिनिधित्व वाढू शकतं. भाजप सहकारी पक्ष जेडीयू आणि अपना दल (एस) ला प्रतिनिधित्व मिळण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात येत आहे. पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात आरपीआयचे नेते रामदास आठवले हे एकमेव गैर भाजप नेते आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळात सध्या 53 मंत्री आहेत. नियमानुसार मंत्र्यांची जास्तीत जास्त संख्या ही 81 आहे.
Recommendation for You

Post Views : 190 पालघर- वसई-विरार चे प्रथम महापौर, ज्येष्ठ समाजसेवक, उद्योजक, ख्यातनाम बांधकाम व्यावसायिक…

Post Views : 190 पालघर-योगेश चांदेकर पालघरः पालघर जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपचे जिल्हाध्यक्ष…

Post Views : 190 पालघर-योगेश चांदेकर पालघरः डहाणू नगरपालिकेच्या नगराध्यक्ष आणि २७ नगरसेवकांच्या निवडणुकीसाठी भारतीय…

Post Views : 190 जिल्ह्यात सुरू असलेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकीदरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी पालघर…












