नवी दिल्ली : देशात कोरोनाचा आलेख आता हळूहळू घसरू लागला आहे. ही एक दिलासादायक बाब म्हणावी लागेल. देशात गेल्या 24 तासात 50 हजार 784 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 1359 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 3 कोटी झाला आहे. सध्या देशातील विविध भागात 6 लाख 38 हजार रुग्णांवर उपचार सुरु असून, आतापर्यंत कोरोनामुळे 3 लाख 90 हजार जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक म्हणजे आतापर्यंत 2 कोटी 89 लाख जणांची कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले आहे. महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 9043 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 482 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील विविध भागात 1.23 लाख रुग्णांवर उपचार सुरू आहे.