banner 728x90

गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर दगडफेक, ‘मला गोळ्या जरी घातल्या तरी मी घाबरणार नाही’ दगडफेकीनंतर पडळकरांची प्रतिक्रिया

banner 468x60

Share This:

सोलापूर : भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे.या दगडफेकीत गाडीची काच फुटून मोठे नुकसान झालं आहे. सुदैवाने यामध्ये कुणालाही दुखापत झालेली नाही. गाडीवर दगड फेकणारा तो व्यक्ती कोण होता याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाहीये.  एका तरुणाने पडळकरांच्या गाडीवर मोठा दगड फेकल्याची माहिती मिळत आहे.

गाडीची काच फोडल्यानंतर या व्यक्तीनं त्याठिकाणाहून पळ काढला. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून, सोलापूर येथील मड्डी वस्ती येथे त्यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. सोलापूरमध्ये गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर अज्ञातांनी केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ भाजप कार्यकर्त्यांनी शरद पवारांच्या विरोधात घोषणाबाजी केली.
या घटनेनंतर गोपीचंद पडळकर यांनी सांगितले की,  बुधवारी सकाळपासून सोलापूर शहर आणि ग्रामीण भागात माझ्या बैठका सुरू होत्या. त्यानंतर मड्डी वस्ती येथील बैठकीला मी पोहोचलो. ही बैठक झाल्यावर मी गाडीत बसून निघालो होतो त्याचवेळी एका व्यक्तीने गाडीवर हल्ला केला. सोलापूर येथे माझा कुणासोबतही वाद नाही. माझा आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण मला गोळ्या जरी घातल्या तरी मी घाबरणार नाही. गाडीच्या पुढे मोठा दगड मारण्यात आला. गाडीची काच फुटली आहे. मला आणि माझ्या सहकाऱ्यांना कुठलीही दुखापत झालेली नाही. आमदार गोपीचंद पडळकर हे गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांवर टीका करत आहेत. शरद पवार, संजय राऊत यांच्यावर सातत्याने पडळकर टीका करत आहेत. अशात त्यांच्या गाडीवर झालेल्या या हल्ल्यानं चर्चांना उधाण आलं आहे.
दरम्यान, विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींच्या आरक्षणा संदर्भात टिप्पणी केली होती. सत्तेत आल्यावर आम्ही ओबीसींच्या आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावू. असे नाही झाल्यास मी राजकारणातून संन्यास घेईल. अशी टिप्पणी त्यांनी केली होती. त्यावर सत्तेतील महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये टीकाटिप्पणी सुरू आहे.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!