banner 728x90

गोपीचंद पडळकरांनी भाऊ म्हणून स्वीकारली, स्वप्नीलच्या बहिणीच्या लग्नाची जबाबदारी

banner 468x60

Share This:

पुणे : भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी काही दिवसांपूर्वी आत्महत्या केलेल्या दौंड तालुक्यातील केडगाव येथे स्वप्नील लोणकरच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यानंतर त्यांनी माणुसकी दाखवत स्वप्नील लोणकर याच्या बहिणीच्या लग्नाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली आहे.

आपला मित्र स्वप्नील लोणकर यांच्या कुटुंबाला आज मी भेट दिली. आई-वडिलांचं सांत्वन केलं. खरंतर त्यांच्याशी काय बोलावं हे कळत नव्हतं. आईचं दुख: फक्त आईलाच समजतं, आपण समजू शकत नाही. पण स्वप्नीलला न्याय मिळण्यासाठी मी तुमच्या पाठीशी कायम खंबीरपणे उभा आहे याची ग्वाही त्यांना दिली. तसेच स्वप्नीलचा भाऊ म्हणून पुजाच्या लग्नाची संपूर्ण जबाबदारी मी उचलणार असेही ते म्हणाले.
दरम्यान, स्वप्नील लोणकरच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केल्यानंतर मीडियाशी  बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यावर टीकास्त्र केले. अजित पवार यांना त्यांचा मुलगा पार्थची काळजी आहे. स्वप्नीलच्या आत्महत्येशी त्यांचे काही घेणेदेणे नाही. पार्थला आमदारकी, खासदारकी किंवा एखादा कारखाना मिळतो का याचीच जास्त चिंता अजित पवारांना आहे, असा आरोप पडळकर यांनी केला.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!