हैदराबाद : काही दिवसांपूर्वीच घडलेल्या महिला डॉक्टरवरील सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणामुळे संपूर्ण देश सुन्न झाला होता. आरोपींना कठोर शिक्षेची मागणी देशभरातून होत होती. पण शुक्रवारची सकाळ सर्वांसाठी वेगळी ठरली. आरोपींनी ज्या ठिकाणी निर्घृण कृत्य केलं होतं, त्याच ठिकाणी त्यांचा खात्मा झाला. घटनास्थळावर आरोपींना नेण्यात येत असताना त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी झालेल्या चकमकीत चारही आरोपींचा खात्मा झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांच्या या कामगिरीचं लोकांकडून कौतुक करण्यात येत आहे. घटनास्थळी दाखल होऊन पोलिसांवर लोकांनी पुष्पवर्षावही केला.
हैदराबादचे ‘सिंघम’; सोशल मीडियावर ‘सॅल्यूट’
एनकाऊंटरची माहिती मिळताच घटनास्थळावर नागरिकांनी प्रचंड गर्दी केली. ज्याच्या कानावर ही माहिती पडली, त्याने घटनास्थळाकडे धाव घेतली. लोकांना सांभाळण्यासाठी पोलिसांना मोठी मेहनतही करावी लागली. जमाव पाहता अतिरिक्त तुकडी मागवण्यात आली.
घटनास्थळावरच न्याय;पोलिसांवर फुलांचा वर्षाव
Recommendation for You

Post Views : 54 पालघर- वसई-विरार चे प्रथम महापौर, ज्येष्ठ समाजसेवक, उद्योजक, ख्यातनाम बांधकाम व्यावसायिक…

Post Views : 54 पालघर-योगेश चांदेकर पालघरः पालघर जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपचे जिल्हाध्यक्ष…

Post Views : 54 पालघर-योगेश चांदेकर पालघरः डहाणू नगरपालिकेच्या नगराध्यक्ष आणि २७ नगरसेवकांच्या निवडणुकीसाठी भारतीय…

Post Views : 54 जिल्ह्यात सुरू असलेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकीदरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी पालघर…













