banner 728x90

चोर सोडून संन्याशाला फाशी; पालघर आरोग्य विभागाच्या अजब न्याय

banner 468x60

Share This:

पालघर : योगेश चांदेकर – जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात सेवेत असलेले कर्तव्यदक्ष पालघर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजित खंदारे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आल्याने आरोग्य विभागातील अनियमित गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे. कोरोना काळात जीवाची पर्वा न जनतेच्या आरोग्यासाठी प्राथमिकता देणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याला अन्यायकारक वागणूक देताना ” चोर सोडून संन्याशाला फाशी ” या उक्तीप्रमाणे गैरमात्रा लागू केली आहे. त्याचे पडसाद तीव्र जिल्ह्यात उमटले असून आरोग्य संघटना डॉ. खंदारे यांच्या समर्थनार्थ एकवटल्या आहेत.

पालघरचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. खंदारे यांनी कोरोना काळात प्रशासनाने निर्गमित केलेल्या आदेशानुसार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत कोविड 19 विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कर्तव्यात कोणतीही कसूर न करता प्रामाणिकपणे सेवाकार्य बजावले आहे. त्यांच्या या कार्याचे कौतुक पालघरची जनता, विविध सामाजिक संस्था व प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील केली आहे. तरीदेखील त्यांच्याविषयी खोटी तक्रार आल्याने कोणत्याही प्रकारची शहानिशा न करताच जिल्हा आरोग्य विभागाने त्यांच्यावर अन्यायकारक कारवाई करून सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा तुघलकी निर्णय घेतला. 
नेमके प्रकरण काय आहे ?
दि.28 जुलै 2021 रोजी पालघर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या आदेशानुसार लसीकरण करण्यात आले. जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. मिलिंद चव्हाण यांच्या सूचनांचे तंतोतंत पालन करत  38 जणांचे लसीकरण करण्यात आले. हे सर्वजण जिल्हा आरोग्य विभागातील अधिकारी व कार्यालयीन कर्मचारी यांचे नातेवाईक आहेत. यासाठी जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ मिलिंद चव्हाण यांनी लस उपलब्ध करून दिली. यादिवशी लसीकरणाच्या वेळी डॉ. खंदारे हे जिल्हा परिषद अध्यक्षा यांच्या कार्यालयीन दालनांत उपस्थित होते. सेवेत असलेल्या नर्सेस यांनी लसीकरण केले. मात्र, तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या कार्यालयात लसीकरण केल्याचा ठपका ठेवून डॉ. खंदारे यांच्यावर अनियमित कारवाई केल्याने अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या. कारण लसीकरणाबाबत सूचना देणाऱ्या डॉ चव्हाण यांना वरिष्ठ आरोग्य अधिकारी पाठिशी घालत असून ज्यांनी नेहमीच वरिष्ठांच्या आदेशानुसार सेवा कर्तव्य पार पाडले अशा डॉ खंदारे यांच्यावर कारवाईची बडगा उगारला, हे अन्याय करणारे आहे.
डॉ.अभिजित खंदारे यांची प्रतिक्रिया
या प्रकरणी डॉ खंदारे यांचा काहीही दोष नसताना तक्रारी दाखल झाल्याचे कारण देत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ दयानंद सूर्यवंशी यांनी कारवाई केली खरी पण याबाबत सत्यता पडताळून पाहता आली असती. लसीकरण करणाऱ्या व्यक्ती या आरोग्य अधिकारी आणि आरोग्य विभागातील कर्मचारी यांचे नातेवाईक आहेत. लसीकरणसाठी 500 रुपये घेतल्याचा खोटा कांगावा करण्यात आल्याने कर्तव्यनिष्ठ डॉ. खंदारे यांना मोठा मानसिक आघात बसला आहे. निर्दोष असूनही कारवाई करण्यात आल्याने ते प्रचंड तणावाखाली आहेत.आतापर्यंत केलेल्या प्रामाणिकसेवा परायण कार्याला यामुळे सामाजिक अब्रुनुकसानीचा फटका बसला आहे.
आरोग्य विभागाची कारवाई अनाकलनीय आणि अन्यायकारक
शासनाने लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयातही लसीकरण केंद्र सुरू करण्यात आली आहेत.असे असताना पालघर वैद्यकीय अधिकारी यांच्या कार्यालयात जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ मिलिंद चव्हाण यांनी दि 28 जुलै रोजी विशेष लसीकरण करण्याचे आदेश दिले. त्यानुसार डॉ खंदारे यांच्या कार्यालयात लसीकरण करणे नियमबाह्य कसे ठरू शकते ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे ही कारवाई पूर्वग्रहदूषित असल्याचे जनतेचे म्हणणे आहे. या अन्यायकारक कारवाई विरोधात महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटना, जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी संघटना, पालघर तालूका आरोग्य कर्मचारी कृती समिती,तसेच पालघर तालुक्यातील वैद्यकीय अधिकारी यासारख्या आरोग्य संघटनांनी दंड थोपटले असून याविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
डॉ.खंदारे चौकशी समिती समोर गौप्यस्फोटाच्या तयारीत
एकतर्फी आणि चुकीची कारवाई झाल्याने त्याबाबत सर्व महत्वाची माहिती आणि स्वतःचे निर्दोषत्व सिद्ध करण्याची माहिती चौकशी समिती समोर मांडण्यात येईल, त्यामध्ये मोठा गौप्यस्फोट करणार  असल्याचे समजते.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!