मुंबई : मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला आहे. यावेळी 43 नव्या मंत्र्यांनी शपथ घेतली. अनेकांना या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं काही खासदार नाराज असल्याचं समोर येत आहे. मंत्रीपद न मिळाल्यानं उदयनराजे नाराज असल्याची चर्चा आहे. त्यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी उदयनराजे यांची बाजू घेत भाजपला टोला लगावला आहे.
Home
पालघर
'छत्रपतींच्या गादीला डावलण्याचं काम करून भाजपने उदयनराजेंचा अवमान केला'; आमदार शशिकांत शिंदे
‘छत्रपतींच्या गादीला डावलण्याचं काम करून भाजपने उदयनराजेंचा अवमान केला’; आमदार शशिकांत शिंदे
उदयनराजे भोसले यांना मुदतपूर्व राजीनामा देण्यास सांगून भाजपने त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये संधी देण्याचा शब्द दिला होता. मात्र संधी न देऊन एकप्रकारे उदयनराजेंचा अवमान केला आहे. भाजपाने त्यांचा केवळ राजकीय वापर करून घेतला. त्यांचा योग्य तो सन्मान ठेवला नाही. छत्रपतींच्या गादीला डावलण्याचे काम कोण करत आहे, हे सामान्य जनतेला चांगले माहीत आहे. भारतीय जनता पक्षाने शब्द दिला होता, मात्र केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये संधी न देऊन खासदार उदयनराजे भोसले यांचा एकप्रकारे अवमानच केला आहे, असं म्हणत शशिकांत शिंदे यांनी भाजपवर टीका केली आहे.
शरद पवार यांचे उदयनराजे भोसले यांच्यावर विशेष प्रेम आहे. ते राष्ट्रवादी पक्षाचे खासदार होते. उदयनराजे भोसले हे आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असते, तर त्यांच्या शब्दाला राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये वजन असतं. मात्र भाजपने फक्त उदयनराजेंचा वापर करून घेतला, अशी टीका देखील त्यांनी केली आहे.
Recommendation for You

Post Views : 131 पालघर- वसई-विरार चे प्रथम महापौर, ज्येष्ठ समाजसेवक, उद्योजक, ख्यातनाम बांधकाम व्यावसायिक…

Post Views : 131 पालघर-योगेश चांदेकर पालघरः पालघर जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपचे जिल्हाध्यक्ष…

Post Views : 131 पालघर-योगेश चांदेकर पालघरः डहाणू नगरपालिकेच्या नगराध्यक्ष आणि २७ नगरसेवकांच्या निवडणुकीसाठी भारतीय…

Post Views : 131 जिल्ह्यात सुरू असलेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकीदरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी पालघर…












