banner 728x90

जरंडेश्वर साखर कारखान्यावर ईडीची कारवाई होताच अजित पवार म्हणाले…

banner 468x60

Share This:

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मामा राजेंद्र कुमार घाटगे यांच्या जरंडेश्वर साखर कारखान्यावर ईडीने गुरुवारी कारवाई केली आहे. महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळ्या प्रकरणात ईडीने ही कारवाई केली असल्याचं सांगितले जात आहे. ईडीच्या या कारवाईवर अजित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेत प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार म्हणाले की, जरंडेश्वर साखर कारखाना माझ्या नातेवाईकांचा असला तरी ईडीला चौकशी करण्याचा पूर्ण अधिकार आहे. सीआयडीने देखील यापुर्वी चौकशी केली होती, मात्र त्यातून काही निष्पन्न झाले नव्हते. आता वकिलांचा सल्ला घेऊन जरंडेश्वर कारखान्याद्वारे न्यायालयामध्ये अपील केली जाईल.
तसेच सुंदरबाग सोसायटीने याबाबत याचिका दाखल केली होती. त्यात 14 कारखान्यांचा समावेश होता. यामध्ये माझ्या नातेवाईकांचा जरंडेश्वर कारखाना देखील होता. मात्र, 2016 आणि 2017 मध्ये सर्व रितसर परवानग्या घेण्यात आल्या होत्या, अशी देखील माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली आहे.
दरम्यान, यासंदर्भात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली होती.
साखर कारखान्यांच्या अनेक मालकांनी बँकेतून कर्ज घेऊन बुडवलं आहे. त्यानंतर साखर कारखान्याची कमी भावात विक्री झाली असल्याची माहिती समजत आहे. या गुन्ह्याच्या अनुषंगाने ईडीने गुन्हा दाखल करत त्यानुसार ही कारवाई केली असल्याची माहिती समोर येत आहे.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!