banner 728x90

तुमच्या त्या ‘महान’ नेत्याला आवरा; गोपीचंद पडळकर संदर्भात रोहित पवारांनी थेट मोदींकडे तक्रार

banner 468x60

Share This:

अहमदनगर : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांची तक्रार थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे. ‘आपल्या पक्षातील एका ‘महान’ नेत्याने केलेल्या मूर्खपणाच्या विधानांमुळे राज्यातील राजकीय संस्कृती खराब होईल, अशी भीती आमच्यासारख्या नव्या पिढीला वाटते. त्यामुळे आपल्यासारख्या वरिष्ठ नेत्यांनी योग्य पावले उचलली पाहिजेत, ही आमची अपेक्षा आणि विनंती आहे, अशी तक्रार रोहित पवार यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याकडे केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या संन्यास घेण्याच्या विधानावर भाजप आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये आरोप प्रत्यारोप होत होते. त्यामध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांनी उडी घेत. ‘मी शरद पवारांना काहीच समजत नाही’ असे विधान केले होते. त्यानंतर त्यांच्या वाहनावर झालेली दगडफेक, सोलापूरमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यालयावर झालेला हल्ला अशा घटना घडल्या आहेत. त्यासोबतच भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी यावर एकमेकांवर बोट दाखवले. रोहित पवार यांनी पडळकर यांना भाजपचे नेते प्रोत्साहन देत असल्याचा आरोप केला होता. पडळकर यांना खालच्या स्तरावर जाऊन उत्तर देणे शक्य नाही, त्यामुळे भाजपच्या नेत्यांनीच याला आवार घालावा, अशी मागणीही पवार यांनी केली होती. त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी पडळकर यांना पाठिशी घालणारे सूचक विधान केले होते.
रोहित पवार यांनी हिंदीतून ट्विट करीत पंतप्रधान मोदी आणि भाजपचे अध्यक्ष नड्डा यांचे या मुद्द्याकडे लक्ष वेधले आहे. ‘विरोधकांनाही मान देण्याची एक स्वतंत्र राजकीय संस्कृती महाराष्ट्रात असून, आजवर सर्व पक्षातील नेत्यांनी ती टिकवण्याचा प्रयत्न केला आहे. पण, शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यावर टीका करून राज्यातील भाजपच्या एका ‘महान’ नेत्याने अलीकडेच खालच्या स्तरापर्यंत मजल मारली आहे. आपल्याकडेही देवी देवता म्हणून उपासना करण्याची संस्कृती आहे. 
पण, त्या ‘थोर’ नेत्याने आपल्या वक्तव्यात महिलांचा अनादरही केला आहे. आश्चर्य म्हणजे राज्यातील अन्य कोणत्याही भाजप नेत्याने त्यांना फटकारले नाही, किंवा त्यावर काही टीका टिप्पणी केली नाही. हे केवळ राज्याच्या संस्कृतीशी सुसंगत नाही तर माझ्यासारख्या नवीन पिढीला अशी भीती वाटते की अशा ‘महान’ नेत्याने केलेल्या मूर्खपणाच्या विधानांमुळे राज्यातील राजकीय संस्कृती खराब होईल. मात्र, आम्ही हे होऊ देणार नाही. परंतु आपल्यासारख्या वरिष्ठ नेत्यांनीही योग्य पावले उचलली पाहिजेत, ही आमची अपेक्षा आणि विनंती आहे.’ असे ट्विट रोहित पवार यांनी पंतप्रधान मोदी आणि जे.पी. नड्डा यांना केले आहे.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!