banner 728x90

देशात कोरोनाचा वेग मंदावला; गेल्या 24 तासात 37 हजार जणांना कोरोनाची लागण

banner 468x60

Share This:

नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासात 37 हजार 566 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 907 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 3 कोटी 3 लाख 16 हजार 897 इतका झाला आहे. गेल्या 24 तासात 56 हजार 994 जणांनी कोरोनावर मात केली असून, आतापर्यंत 2 कोटी 93 लाख 66 हजार 601 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या देशातील विविध भागात 5 लाख 52 हजार 659 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर उपचारादरम्यान दुर्दैवाने आतापर्यंत 3 लाख 97 हजार 637 जणांचा मृत्यू झाला आहे.

देशात गेल्या 24 तासात 52 लाख 76 हजार 457 जणांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. आतापर्यंत 32 कोटी 90 लाख 29 हजार 510 जणांनी कोरोनाची लस घेतली आहे.
केंद्रीय आरोग्य विभागाने सांगितले की, देशात गेल्या 102 दिवसांनंतर पहिल्यांदा 40 हजारच्या खाली कोरोना रुग्ण आढळले आहेत. सध्या देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचा प्रमाण 96.87 टक्के इतका आहे. तर पॉझिटीव्ह रेट हा 2.12 टक्के इतका आहे.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!