banner 728x90

धक्कादायक! ‘डॉक्टर डे’च्या दिवशीच; पुण्यात एका डॉक्टर दाम्पत्याची गळफास घेऊन आत्महत्या

banner 468x60

Share This:

पुणे : आज आंतरराष्ट्रीय ‘डॉक्टर डे’ आहे. आज प्रत्येक जण आपल्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरला शुभेच्छा देत आहेत. मात्र, आजच्याच दिवशी पुण्यात एका डॉक्टर दाम्पत्यानं आत्महत्या केली आहे. पुण्यातल्या वानवडी येथील आझादनगरमध्ये ही धक्कादायक घटना घडली असून, डॉ.निखिल शेंडकर आणि डॉ.अंकिता शेंडकर अशी मृत डॉक्टर दाम्पत्यांचं नाव आहे.

काल रात्री आधी डॉ.अंकिता यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. हाच धक्का न सावरलेल्या डॉ.निखिल यांनीही आज आत्महत्या केली आहे, अशी माहिती वानवडी पोलिसांनी दिली आहे.
बुधवारी रात्री 26 वर्षीय डॉ.अंकिता शेंडकर यांनी राहत्या घरी पंख्याला ओढणी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर पत्नीचा मृत्यू सहन न झालेल्या 28 वर्षीय निखिल शेंडकर यांनीही आज सकाळी राहत्या घरी ओढणीच्या साहाय्याने आत्महत्या केली. दरम्यान डॉक्टर पत्नीच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. घरात कोणतीही सुसाईड नोट सापडली नसून पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!