banner 728x90

नारायण राणे यांना मंत्रिमंडळात संधी; कोकणात भाजप विस्ताराला होणार मदत

banner 468x60

Share This:

मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान खासदार नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात मानाचे स्थान मिळाले आहे. राणे यांनी शपथ घेतल्यानंतर कोकणातील त्यांच्या निकटवर्तीयांनी मोठा जल्लोष केला. कोकणातील शिवसेनेची ताकद कमी करण्यासाठी भाजपने हे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे.

 भारतीय जनता पक्षाचा सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत फारसा प्रभाव नाही, त्या पार्श्वभूमीवर भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने राणे यांना मंत्रिमंडळात संधी दिली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांवर राणे यांची मजबूत पकड आहे. सिंधुदुर्गातील जिल्हा परिषद आणि बहुसंख्य ग्रामपंचायती राणे यांच्या ताब्यात आहेत. सध्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषद भाजपकडे आली. मात्र दुसरीकडे रत्नागिरीत शिवसेनेची पकड मजबूत आहे. तिथे भाजपचा झेंडा रोवण्यासाठी राणे यांना मोठे कष्ट घ्यावे लागणार आहे. भाजपला एकूणच कोकणात फायदा होण्याची शक्यता आहे. भाजपने या सर्व मुद्द्यांचा विचार करून नारायण राणे यांना केंद्रात स्थान दिले आहे.
एक शिवसैनिक, नंतर नगरसेवक, बेस्ट समितीचे अध्यक्ष, कणकवलीचे आमदार, मंत्री, मुख्यमंत्री, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते आणि आता केंद्रीय मंत्री असा दमदार प्रवास नारायण राणे यांचा राहिला आहे. शपथविधी झाल्यानंतर आमदार नीतेश राणे आणि माजी खासदार नीलेश राणे यांनी एकमेकांना लाडू भरवून आनंद व्यक्त केला.
आमदार नीतेश राणे म्हणाले, ‘काँग्रेसला बारा वर्षांत जमले नाही, ते भाजपने एक-दोन वर्षांतच करून दाखवले. मला आमदारकीचे तिकीट दिले. नीलेश यांना भाजपचे सरचिटणीस केले आणि नारायण राणे यांना खासदार आणि मंत्री केले. भाजप नेतृत्वाचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत.’अशी प्रतिक्रिया नीतेश यांनी दिली.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!