banner 728x90

पर्यटनाला राज्य किंवा जिल्ह्याबाहेर गेल्यास 15 दिवस क्वाॅरंटाइन; उपमुख्यमंत्र्यांचा मोठा इशारा

banner 468x60

Share This:

पुणे : राज्यात काही प्रमाणात कोरोना ओसरला असला तरी, राज्यातील अनेक जिल्ह्यात धोका कायम आहे. सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, बीड, उस्मानाबाद, काेल्हापूर या काही जिल्ह्यांत अद्याप काेराेनाचे संकट आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. वीकेंडला पर्यटनस्थळी माेठ्या प्रमाणात गर्दी केली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी काेराेनाचे संकट गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. महाराष्ट्राबाहेर व जिल्ह्याबाहेरही माेठ्या प्रमाणात नागरिक फिरण्यास व ट्रेकिंगला जात आहेत. जर रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली तर त्यांना राज्यात, जिल्ह्यात परत आल्यानंतर 15 दिवस क्वाॅरंटाइन राहावे लागेल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.

परदेशातील अमेरिका, इंग्लंड व दक्षिण आफ्रिका येथे काेराेनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा टास्क फोर्सने दिला आहे. त्या ठिकाणी लसीकरण वेगाने हाेऊनही भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी काेराेनाचे संकट गांभीर्याने घेतले पाहिजे. पिंपरी-चिंचवड शहरात काेराेनाच्या दुसऱ्या लाटेतील मृत्यूंचे विश्लेषण केले असता, चार नामांकित रुग्णालयांत 53 टक्के मृत्यू 30 ते 60 वयोगटा दरम्यान झाले आहे. तर 43 टक्के मृत्यू हे काेणतेही आजार नसताना झालेले आहेत. पाॅझिटिव्हिटी दर पुणे शहरात पाच टक्के, पिंपरी-चिंचवडमध्ये 5.2 टक्के तर ग्रामीण भागात 9 टक्के आहे. अनावश्यक प्रवास, सहली, पर्यटन नागरिकांनी टाळावे. अन्यथा कडक कारवाईला सामाेरे जावे लागेल. स्वत:चा जीव धाेक्यात घालण्यासाेबत इतरांचा जीव काेणी धाेक्यात घालू नये.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!