मुंबई ः नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून पाकिस्तानने भारताचा धसका घेतला आहे. त्यांच्या मनात सतत भीतीचे वातावरण आहे. सर्जिकल स्ट्राईक केल्यापासून तर त्यांची झोपच उडाली आहे.
पाकिस्तानला आता पुन्हा एकदा सर्जिक स्ट्राइकची भीती सतावत आहे. या धास्तीपोटी पाकिस्तानने आपल्या सैन्याला सतर्क राहण्याचा इशारा दिल्याचे वृ
त्त आहे. इम्रान सरकारने अधिकृतरित्या कोणतीही माहिती दिली नसली तरी स्थानिक न्यूज चॅनेलच्या माध्यमातून त्यांनी सर्जिकल स्ट्राईकची चिंता व्यक्त केली आहे.
पाकिस्तान नेहमीच कोणत्यातही मुद्याच्या आडून भारतात दहशतवादी कारवायाला प्रोत्साहन देत असते, असे देखील काही अभ्यासकांचे मत आहे. दहशतवाद्यांच्या घुसखोरीच्या माध्यमातून जम्मू काश्मीरमध्ये अशांती निर्माण करण्याचे नापाक इरादे पाकिस्तान सरकार आणि लष्करासह आयएसआयकडून सुरु आहेत. याकडे दुर्लक्ष व्हावे या उद्देशाने पाकिस्तान फेक बातम्या पसरवत असल्याचेही बोलले जात आहे.
2016 मध्ये भारताने उरी येथील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवादी तळे उद्धवस्त केली होती. सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कारवाईत अनेक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. त्यानंतर पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतरही भारताने बालकोट येथील दहशतवादी तळे उद्धवस्त केली होती.