banner 728x90

पावसाळी अधिवेशन: ठाकरे सरकार यंदाचं पावसाळी अधिवेशन दोनच दिवसात गुंडळणार

banner 468x60

Share This:

मुंबई : यंदाचे होणारे पावसाळी अधिवेशन दोनच दिवसात गुंडाळण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. त्यामुळे येत्या 5 आणि 6 जुलै असे दोनच दिवस पावसाळी अधिवेशन होणार आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितल्या जात आहे. अल्प दिवसांच्या या अधिवेशनाला विरोधी पक्षांना कडाडून विरोध केला असून, ही लोकशाहीची हत्या आहे असा आरोप त्यांनी सत्ताधारी पक्षावर लावला आहे. 

विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक विधिभवनांच्या प्रांगणात मंगळवारी पार पडली. या बैठकीला विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, उपसभापती नरहरी झिरवाळ, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर,महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, संसदीय कार्यमंत्री अनिल परब, मंत्रिमंडळातील सदस्य, विधान परिषद आणि संसदीय कार्य विभागाचे सचिव राजेंद्र भागवत आदी जण उपस्थित होते. या बैठकीत विधान परिषद आणि विधान सभा कामकाजासंदर्भात दिनदर्शिकेवर चर्चा करण्यात आली.
अधिवेशनात सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. तसेच विधिमंडळात गर्दी होऊ नये म्हणून, मंत्री व राज्यमंत्री यांच्यासोबत एकाच अधिकाऱ्याला प्रवेश असेल. 
सामाजिक अंतर पाळण्यासाठी सभागृहात एका आसनावर एकच सदस्य बसणार आहे. तसेच प्रेक्षक गॅलरी आणि विद्यार्थी गॅलरीमध्ये देखील सदस्यांची बसण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. 
विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी 4 फेब्रुवारी रोजी आपला राजीनामा दिला होता. तेव्हापासून अध्यक्षपदाची निवड प्रलंबित आहे. मागच्या अधिवेशनात राज्यपालांनी विधानसभा अध्यक्ष निवडा असे आदेश दिले होते. मात्र अद्याप निवड झालेली नाही.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!