मुंबई – पृथ्वीराज चव्हाण यांचा राज्य कारभारच वांझोटा होता असं म्हणत राज ठाकरेंनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं. डोंबिवलीतल्या सभेत राज ठाकरे बोलत होते. पूर्वी सिनेमात राजशेखर नावाचे खलनायक काम करायचे त्यांच्याप्रमाणेच पृथ्वीराज चव्हाण दिसतात. त्यांनी मुख्यमंत्रीपदी असताना जो काही कारभार केला तो वांझोटा होता. त्या कारभाराचा ना त्यांच्या पक्षाला उपयोग झाला ना इतर कुणाला उपयोग झाला ना राज्याला उपयोग असं म्हणत राज ठाकरेंनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर घणाघाती टीका केली.
जेव्हा पृथ्वीराज चव्हाण आले तेव्हाच मी बोललो होतो की हे मराठी सिनेमातल्या व्हिलनसारखे दिसतात असं म्हणत पृथ्वीराज चव्हाण यांची खिल्लीही राज ठाकरेंनी उडवली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची डोंबिवली या ठिकाणी सभा होती. त्या सभेत राज ठाकरेंनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या राज्य कारभाराची खिल्ली उडवली.
पृथ्वीराज चव्हाण यांचा कारभारच वांझोटा होता : राज ठाकरे
Recommendation for You

Post Views : 103 आज सर्वत्र गुढीपाडव्याचा उत्साह, नववर्षाचे स्वागत आणि मांगल्याचे वातावरण असतानाच महाराष्ट्रातील…

Post Views : 103 परवानगीशिवाय हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये दारू आढळल्यास संबंधितांचे परवाने रद्द करण्यात येतील,…

Post Views : 103 महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनची अतिवृष्टीग्रस्त शेतकरी बांधवांसाठी मदत महाराष्ट्र…

Post Views : 103 राज्यातील पालघर जिल्ह्यातील एका औषध (फार्मास्युटिकल) निर्मिती कारखान्यात आज सकाळी भीषण…













