मुंबई – पृथ्वीराज चव्हाण यांचा राज्य कारभारच वांझोटा होता असं म्हणत राज ठाकरेंनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं. डोंबिवलीतल्या सभेत राज ठाकरे बोलत होते. पूर्वी सिनेमात राजशेखर नावाचे खलनायक काम करायचे त्यांच्याप्रमाणेच पृथ्वीराज चव्हाण दिसतात. त्यांनी मुख्यमंत्रीपदी असताना जो काही कारभार केला तो वांझोटा होता. त्या कारभाराचा ना त्यांच्या पक्षाला उपयोग झाला ना इतर कुणाला उपयोग झाला ना राज्याला उपयोग असं म्हणत राज ठाकरेंनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर घणाघाती टीका केली.
जेव्हा पृथ्वीराज चव्हाण आले तेव्हाच मी बोललो होतो की हे मराठी सिनेमातल्या व्हिलनसारखे दिसतात असं म्हणत पृथ्वीराज चव्हाण यांची खिल्लीही राज ठाकरेंनी उडवली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची डोंबिवली या ठिकाणी सभा होती. त्या सभेत राज ठाकरेंनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या राज्य कारभाराची खिल्ली उडवली.
पृथ्वीराज चव्हाण यांचा कारभारच वांझोटा होता : राज ठाकरे
Recommendation for You

Post Views : 115 महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाने (म्हाडा) आपल्या पावसाळ्यापूर्वीच्या वार्षिक सर्वेक्षणामध्ये…

Post Views : 115 शासनाच्या कृती आराखड्यासह ‘व्यसनमुक्त महाराष्ट्र अभियान’ २५ जूनपासून सुरू होणार आहे…

Post Views : 115 मुंबई पालिकेने सर्व वॉर्ड कार्यालयांमध्ये EV चार्जिंग स्टेशन उभारण्याची प्रक्रिया सुरू…

Post Views : 115 पालघर – रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना.. रामदास आठवले…

Post Views : 115 पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील मच्छीमारांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना जारी करण्यात आली…













zzlWzi8qqy8Un4Ec/s320/1001506655.jpg