मुंबई : देवेंद्र फडणवीस याचं विधान ततुम्ही फारच गांभीर्याने घेतलय. याआधीही त्यांनी स्वतंत्र विदर्भ होत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही. असे वक्तव्य केले होते. असा टोला काँग्रेसचे नेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी फडणवीसांवर लगावला आहे. ते आज मुंबई पत्रकारांशी बोलत होते.
फडणवीसांच्या वक्तव्याला गांभीर्याने घेण्याची गरज नाही – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात
‘पुन्हा सत्ता हाती आल्यास ओबीसींनी आरक्षण देईन आणि देऊ शकलो नाही तर राजकारणातून संन्यास घेईन’ असे वक्तव्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया येत आहेत. संजय राऊत यांनीही सामनाच्या अग्रलेखातून फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. ‘मी फडणवीसांना संन्यास घेऊ देणार नाही’ अशी टीका राऊत यांनी केली होती त्यानंतर आता काँग्रेसकडूनही फडणवीस यांच्यावर टीका करण्यात आली आहे. फडणवीस यांच्या वक्तव्याला फारसे गांभीर्य देण्याची गरज नसल्याचं अप्रत्यक्षरित्या सुचवलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत धनगर आरक्षणाचा मुद्दा सोडवू असे म्हटले होते. पण त्यांनी पहिल्या बैठकीत नाही पण अवघ्या पाच वर्षात धनगर समाजाचा प्रश्न मार्गी लावला नाही. ते फक्त समाजाची दिशाभूल करत गेले. सत्तेसाठी वारेमाप बोलायचं व वाटेल ती आश्वासन द्यायची. असा अनुभव भाजपाचा आपल्याला आधीपासूनच आहे. जनमानसाची फसवणूक करणं हा त्यांचा मुख्य उद्देश आहे. असे थोरात म्हणाले.
Recommendation for You

Post Views : 50 पालघर- वसई-विरार चे प्रथम महापौर, ज्येष्ठ समाजसेवक, उद्योजक, ख्यातनाम बांधकाम व्यावसायिक…

Post Views : 50 पालघर-योगेश चांदेकर पालघरः पालघर जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपचे जिल्हाध्यक्ष…

Post Views : 50 पालघर-योगेश चांदेकर पालघरः डहाणू नगरपालिकेच्या नगराध्यक्ष आणि २७ नगरसेवकांच्या निवडणुकीसाठी भारतीय…

Post Views : 50 जिल्ह्यात सुरू असलेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकीदरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी पालघर…












