रत्नागिरी : आमच्या हातात सूत्रे दिल्यास 4 महिन्यात ओबीसींचे आरक्षण परत मिळवून देऊ, अन्यथा राजकारणातून संन्यास घेईल. असे वक्तव्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले होते.
Home
पालघर
फडणवीसांनी राजकारणातुन संन्यास घेतला तर मराठी माणसाचा जाच तरी संपेल, भास्कर जाधव यांचे फडणवीसांवर टीकास्त्र
फडणवीसांनी राजकारणातुन संन्यास घेतला तर मराठी माणसाचा जाच तरी संपेल, भास्कर जाधव यांचे फडणवीसांवर टीकास्त्र
त्यावर आता सत्ताधारी पक्ष महाविकास आघाडीचे नेते टीका करत असून शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनीही फडणवीसांच्या या वक्तव्यावरून निशाणा साधला आहे. “आता देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय संन्यास घ्यावाच, त्यामुळे मराठी माणसाचा जाच तरी संपेल” असा टोला भास्कर जाधव यांनी फडणवीसांना लगावला आहे.
गेल्या दोन वर्षांपासून राज्य सरकार कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. असे असताना देवेंद्र फडणवीस फक्त त्रास देण्याचे काम करत आहेत, अशी टीका भास्कर जाधव यांनी फडणवीसांवर केली आहे. राज्यावर कोणतेही संकट आल्यानंतर सर्वजण पक्षीय राजकारण बाजूला ठेऊन एकत्र येतात आणि संकटांचा सामना करतात, असे आपण आतापर्यंत राजकारणात पाहत आलो आहोत. मात्र, दोन वर्षात देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला फक्त त्रास देण्याचे काम केले आहे. त्यामुळे माझ्या मते त्यानी राजकारणातुन संन्यास घेतला तर मराठी माणसाचा जाच तरी संपेल, अशी घणाघाती टीका करतानाच त्यामुळे फडणवीस यांनी राजकीय संन्यास घ्यावाच, असे आवाहनही भास्कर जाधव यांनी फडणवीसांना केले आहे.
काँगेसने ही फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आदेशाने चालणारा भारतीय जनता पक्ष, केंद्रातील मोदी सरकार व तत्कालीन फडणवीस सरकारमुळेच ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण गेले, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात ओबीसींची आकडेवारी द्यायला हवी होती. ती जर दिली असती तर ही वेळच आली नसती. पण भाजपने ते जाणीवपूर्वक होऊ दिले नाही. असे असतानाही आता भाजपा नेते ओबीसींचा आम्हाला कळवळा असल्याचे दाखवत आहेत, अशी टीका पटोले यांनी केली आहे.
दरम्यान, खासदार संजय राऊत यांनीही फडणवीसांवर टीका केली होती. मी फडणवीस यांना राजकारणातून संन्यास घेऊ देणार नाही. असे मिश्किल टीका राऊत यांनी केली होती. त्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी फडणवीस यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही. असे म्हटले होते. फडणवीसांच्या या वक्तव्यामुळे राजकारणातून मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर टीका केली जात आहे.
Recommendation for You

Post Views : 32 सोनोपंत दांडेकर महाविद्यालय, पालघर येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे (YCMOU)…

Post Views : 32 मासेमारी बंदी कालावधी संपल्यानंतर १ ऑगस्ट पासून मासेमारीसाठी गेलेल्या बोटी जिल्ह्याच्या…

Post Views : 32 पालघर-योगेश चांदेकर पालघरः पाम ग्रामपंचायतीच्या सरपंच दर्शना दत्तात्रय पिंपळे यांच्या विरोधात…

Post Views : 32 पालघर-योगेश चांदेकर शिक्षणाच्या प्रवाहात कातकरी समाजाला आणण्यासाठी विशेष उपक्रम पालघरः पालघर…