banner 728x90

बोईसर औद्योगिक वसाहतीत बोकाळतोय भ्रष्टाचाराचा विषारी नाग; राजकिय वरदहस्त असल्याने अवैध धंद्याला खतपाणी

banner 468x60

Share This:

पालघर : योगेश चांदेकर – बोईसर एमआयडीसीत एक विषारी कोब्रा जन्माला आला आहे. पिंपळात बसून लपलेला हा विषारी कोब्रा, राजकीय पक्षाचा पदाधिकारी असल्याने तो वेळोवेळी दमदाटी करून आपल्या पदाचा दुरुपयोग करत आहे. हा पिंपळात बसलेला विषारी कोब्रा मोठ्या प्रमाणात अवैध धंदे करून, मोठ्या पदावर असल्याचे भासवत कंपन्याना मोठया प्रमाणात गंडा घालत आहे. त्यामुळे या कोब्र्याला एमआयडीसीतील प्रत्येक जण वैतागला आहे. सगळ्यात प्रदूषणकारी परिसर म्हणून, बोईसर- तारापूर एमआयडीसी ओळखली जाते. दरवर्षी या भागात काहीना-काही दुर्घटना होऊन किंवा स्फोटके होऊन आत्तापर्यंत अनेक कामगारांचे जीव गेले आहेत. असे प्रकरण असतांना बोईसर एमआयडीसीत रोज नवनवीन विषारी कोब्रे जन्माला येत आहेत. त्यातलाच एक सर्वात विषारी कोब्रा म्हणजे पिंपळात बसलेला विषारी कोब्रा. हा कोब्रा राजकीय पक्षाचा पदाधिकारी बनून, कंपन्यांना मोठ्या प्रमाणात गंडा घालतोय. 

कोणी राजकीय नेता आला की हा कंपनीत मोठ्या पदावर असणारा कोब्रा त्यांच्यापुढे लोटांगण घालून, राजकीय पुढाऱ्यांच्या  पुढे-पुढे करतोय. आणि मी ह्या-ह्या नेत्याचा जवळचा आहे. असे म्हणत एमआयडीसीत असलेल्या अनेक कंपन्यांना हा कोब्रा राजकीय जोरावर गंडा घालून वसुली करतोय. तर काही ठिकाणी अनेक केमिकल्स माफिया या कोब्र्याच्या मदतीने अवैधरित्या केमिकल्स कारखाने चालवत आहेत. त्यामुळे हवेत मोठ्या प्रमाणात प्रदूषण निर्माण झाला असून, हा कोब्रा आपल्या हितासाठी जनतेच्या जीवाशी खेळत आहे. म्हणून या पिंपळात बसलेल्या विषारी कोब्राल्या ठेचणे आवश्यक आहे. कारण या कोब्र्याचे वेळीच तोंड ठेचले नाही तर, हा कोब्रा अनेकांना डसू शकतो. आणि आणखी नवनवीन कोब्रे जन्माला आणू शकतो. त्यामुळे अनेकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकते. त्यामुळे राजकीय मंडळींनीही आता अशा पिंपळात बसलेल्या कोब्र्यांना आसरा न देता त्यांचे पितळ उघडे करावे. आणि त्यांच्या अवैधरित्या चालणाऱ्या कामाची चौकशी करून त्यांना शिक्षा द्यावी. जेणे करून असे नवनवीन कोब्रे निर्माण होतानाच दहा वेळा विचार करतील.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!