औरंगाबाद : सलमान शेख – राज्यात नवीन विषाणू डेल्टा प्लसचे रुग्ण आढळत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून, राज्य सरकारने दिलेल्या आदेशाचे पालन करून मराठवाड्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व व्यवहार दुपारी चार पर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दुपारी चार नंतर संचारबंदीची कडक अंमलबजावणी केली जाणार असे आदेश देण्यात आले आहे. मराठवाड्यातील जालना आणि लातूर जिल्ह्यात रविवारपासून, तर परभणी, नांदेडमध्ये सोमवारपासून नव्या निर्बंधांचे पालन करावे लागणार आहे. बीड, उस्मानाबाद, हिंगोली या जिल्ह्यात नवे निर्बंध लागू नसतील. मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादमध्ये निर्बंधांबाबत सोमवारी निर्णय होणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यात तिसऱ्या स्तरातील निर्बंध लावण्यासाठी यंत्रणा सज्ज असून, मनपा आणि पोलीस विभागाशी चर्चा झाली आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली. लातूर जिल्ह्यात सर्व अत्यावश्यक सेवेतील दुकाने दुपारी चार वाजेपर्यंत सुरू राहतील. सोबतच अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकानं शनिवारी आणि रविवारी पूर्णतः बंद राहणार आहे. हॉटेल आणि रेस्टॉरंट दुपारी चार वाजेपर्यंत क्षमतेच्या 50 टक्केपर्यंत खुली राहतील. अत्यावश्यक वस्तूंची उत्पादन करणारी, कच्चा मालावर प्रक्रिया करणारी उद्योगं सुरू राहतील.
मराठवाड्यात सोमवारपासून पुन्हा कडक निर्बंध लागू
नांदेड जिल्ह्यातही सोमवारपासून नवे निर्बंध लागू करण्यात येणार असून, बाजारपेठ सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंतच सुरू राहणार आहे. आणि शनिवार आणि रविवार बाजारपेठ पूर्णपणे बंद राहणार आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना बधितांची संख्या कमी होत असून, जिल्ह्याचा पॉसिटीव्ह रेट हा 4 ते 5 टक्क्यांपर्यंत स्थिर आहे. त्यामुळे जिल्ह्यात पूर्वीचे निर्बंध कायम ठेवण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवेतील दुकानं 7 ते 4 यावेळेत सुरू राहतील. मात्र येथेही शनिवारी आणि रविवारी दुकाने उघडता येणार नाहीत.
परभणी जिल्ह्यातही सोमवार पासून अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकानं 4 वाजेपर्यंतच सुरू ठेवा. असे आदेश जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी दिले आहेत. शनिवारी आणि रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहतील. तसेच सार्वजनिक वाहतूक 3 जुलैपर्यंत बंद राहतील.
जालना जिल्ह्यात आजपासून कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 पर्यंत दुकाने सुरू राहतील. शनिवार आणि रविवार येथेही अत्यावश्यक सेवेतील दुकानेच सुरू राहणार आहे. हिंगोली जिल्ह्यात नवे नियम लागू नसणार आहे. हा जिल्हा संवेदनशील असल्याने जुन्या आदेशानुसार जवळपास पूर्ण बाजारपेठ सकाळी 10 ते रात्री 8 पर्यंत सुरू राहतील. मात्र शाळा, क्लासेस, मंदिर, धार्मिक, राजकीय कार्यक्रमांना बंदी असणार आहे.
Recommendation for You

Post Views : 32 सोनोपंत दांडेकर महाविद्यालय, पालघर येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे (YCMOU)…

Post Views : 32 मासेमारी बंदी कालावधी संपल्यानंतर १ ऑगस्ट पासून मासेमारीसाठी गेलेल्या बोटी जिल्ह्याच्या…

Post Views : 32 पालघर-योगेश चांदेकर पालघरः पाम ग्रामपंचायतीच्या सरपंच दर्शना दत्तात्रय पिंपळे यांच्या विरोधात…

Post Views : 32 पालघर-योगेश चांदेकर शिक्षणाच्या प्रवाहात कातकरी समाजाला आणण्यासाठी विशेष उपक्रम पालघरः पालघर…