मुंबई. – पदोन्नतीमधील आरक्षणासाठी रिपब्लिकन पक्षातर्फे दि. 1 जून ते 7 जून आंदोलन सप्ताह राज्यभर पाळण्यात आला. आज आंदोलन सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी राज्यभर रिपब्लिकन पक्षातर्फे जोरदार आंदोलन करण्यात आले.
आंदोलन सप्ताहाचा समारोप मुंबईत बोरिवली तहसील कार्यलयावर रिपाइं मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे; आयोजक जिल्हा अध्यक्ष हरीहर यादव यांच्या नेतृत्वात आंदोलन करून करण्यात आला. यावेळी ऍड. अभयाताई सोनवणे; रमेश गायकवाड; रमेश गौड; कृष्णा गौड; दिलीप व्हावळे; अशोक कांबळे; संदीप शिंदे; हरिबा कोंडे; भीमराव सवातकर; अनिल कोकणे; परशुराम माळी; नवनाथ बनसोडे; ओमप्रकाश यादव; तारबाई वानखडे; रमेश डाके; प्रशांत मोहिते; राजेंद्र जाधव; राजेश खंडागळे; रामराव खंडागळे; भागवत सोनवणे; विनय दवणेकर आदी या आंदोलनात सहभागी झाले होते.
महाविकास आघाडी सरकारने मराठा आरक्षण घालविले; ओबीसींचे राजकीय आरक्षण घालविण्यात आले; दलित आदिवासी मागासवर्गीयांचे पदोन्नतीमधील हक्काचे आरक्षण रोखण्यात आले आहे. त्यामुळे हे सरकार आरक्षण विरोधी सरकार आहे. या सरकार मध्ये आरक्षण विरोधाचा अजेंडा शिवसेनेचा की राष्ट्रवादी चा ते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्ट करावे असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी केले.
पदोन्नतीमधील अरक्षणाच्या मागणीसाठी आज आंदोलन सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी बोरिवली तहसील आणि अंधेरी तहसील कार्यालयावर रिपाइं तर्फे तीव्र आंदोलन करण्यात आले. अंधेरी तहसील कार्यालयावर मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे; जिल्हा अध्यक्ष प्रकाश कमलाकर जाधव आदींच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. पदोन्नतीमधील अरक्षणाच्या मागणीसाठी आज कल्याण मध्ये जिल्हा अध्यक्ष प्रल्हाद जाधव; तालुका अध्यक्ष रामा कांबळे; रमेश बर्वे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. सांगली जिल्ह्यात आटपाडी तहसील कार्यालयावर विशाल काटे आदींच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. राज्यात आज पंढरपूर सह अनेक जिल्हा तालुक्यात रिपाइं तर्फे पदोन्नतीमधील आरक्षणासाठी आंदोलन करण्यात आले.