मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना मनी लाँडरिंगप्रकरणी पुन्हा एकदा ईडीकडून समन्स बजावण्यात आले आहे. आज चौकशीसाठी त्यांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वी अनिल देशमुख यांच्या नागपुरातील व मुंबईतील निवासस्थानी ईडीकडून धाड टाकण्यात आली होती. एकाच वेळी दहा ठिकाणी ही कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर देशमुख व त्यांच्या सहाय्यकांची चौकशी करण्यात आल्यानंतर देशमुखांच्या दोन सचिवांना ताब्यात घेण्यात आलं होतं तर अनिल देशमुखांना चौकशीसाठी ईडीनं समन्स बजावले होते.
माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना ईडीकडून पुन्हा समन्स; चौकशीसाठी हजर राहणार का?
मात्र देशमुख यांनी वकिलांना पाठवून चौकशीसाठी मुदत वाढून घेतली होती. मात्र आता,ईडीने दुसरे समन्स बजावले असून, आज देशमुख यांना चौकशीसाठी बोलावलं आहे. त्यामुळं आज देशमुख चौकशीसाठी हजर राहणार का? याकडे लक्ष लागून राहिले आहे.
दरम्यान, तरुण परमार या वकिलाची ईडीनं चौकशी केली होती. सोमवारी काही कागदपत्रांसह परमार ईडी कार्यालयात हजर झाले होते. राजकीय नेत्यांविरोधात आर्थिक गैरव्यवहारांचे पुरावे असल्याचा दावा करणाऱ्या यावेळी त्यांनी काही प्रशासकीय अधिकाऱ्यांबाबतची माहिती ईडी अधिकाऱ्यांना दिली असून व्यवहारांबाबत तपशीलही दिले असल्याचा दावा परमार यांनी केला आहे.
Recommendation for You

Post Views : 34 सोनोपंत दांडेकर महाविद्यालय, पालघर येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे (YCMOU)…

Post Views : 34 मासेमारी बंदी कालावधी संपल्यानंतर १ ऑगस्ट पासून मासेमारीसाठी गेलेल्या बोटी जिल्ह्याच्या…

Post Views : 34 पालघर-योगेश चांदेकर पालघरः पाम ग्रामपंचायतीच्या सरपंच दर्शना दत्तात्रय पिंपळे यांच्या विरोधात…

Post Views : 34 पालघर-योगेश चांदेकर शिक्षणाच्या प्रवाहात कातकरी समाजाला आणण्यासाठी विशेष उपक्रम पालघरः पालघर…