औरंगाबाद : माझ्या मंत्रिपदाचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच घेतील, असे शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री संजय राठोड यांनी स्पष्ट केलं आहे. संजय राठोड हे सध्या औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
माझ्या मंत्रिपदाचा निर्णय मुख्यमंत्री घेतील- संजय राठोड
मी सध्या संभाजीनगरचा दौरा करत आहे. माझ्या समाजातील आणि भटक्या समाजातील बांधवांची मी भेट घेत आहे. त्यांचे प्रश्न सोडवण्याचा माझा प्रश्न आहे. माझ्या मंत्रीपदाबाबद्दल मला काही बोलायचं नाही. याबाबत मुख्यमंत्रीच निर्णय घेतील. मला त्याबद्दल काहीही बोलायचं नाही, असं संजय राठोड यांनी सांगितलं.
उदय सामंत यांनी माझ्या मंत्रिमंडळातील पुनरागमनाबाबत काही विधान केलं आहे. त्यांची प्रतिक्रिया मी ऐकली नाही. ते माझे स्नेही आहेत. ते बोलले. पण त्याबद्दल त्यांनाच अधिक विचारलं पाहिजे. मी काही बोलू शकत नाही, असं संजय राठोड म्हणाले.
दरम्यान, संजय राठोड यांची कार्यपद्धती धडाक्याची आहे. सरकारमध्ये अशा धडाडीच्या लोकांची गरज आहे. त्यामुळे राठोड हे लवकरच मंत्रिमंडळात सामील होणार, असा विश्वास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला होता. यानंतर संजय राठोड यांचं पुन्हा मंत्रिमंडळात पुनरागमन होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
Recommendation for You

Post Views : 56 पालघर- वसई-विरार चे प्रथम महापौर, ज्येष्ठ समाजसेवक, उद्योजक, ख्यातनाम बांधकाम व्यावसायिक…

Post Views : 56 पालघर-योगेश चांदेकर पालघरः पालघर जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपचे जिल्हाध्यक्ष…

Post Views : 56 पालघर-योगेश चांदेकर पालघरः डहाणू नगरपालिकेच्या नगराध्यक्ष आणि २७ नगरसेवकांच्या निवडणुकीसाठी भारतीय…

Post Views : 56 जिल्ह्यात सुरू असलेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकीदरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी पालघर…












