banner 728x90

मी आणखी 25 वर्षे राजकारणात राहणार- संन्यासाच्या वक्तव्यानंतर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

banner 468x60

Share This:

मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन भाजपच्या राज्यव्यापी आंदोलनात राजकीय संन्यास घेण्याबाबत वक्तव्य केलं होतं. मात्र या वक्तव्यावर फडणवीसांनी आता सारवासारव केल्याचं पाहायला मिळत आहे.

देवेंद्र फडणवीसांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी या मुद्द्यावरुन फडणवीसांना विचारले असता, त्यावेळी आपण पुढील 25 वर्षे तरी राजकारणात राहणार आहोत, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला.
या पुढे मी 25 वर्षे राजकारण करणार आहे. त्यामुळे मी जेव्हा एखादी गोष्ट बोलतो ती विचारपूर्वक बोलतो. मलाही माहीत आहे की, संन्यास घ्यायची गरजच पडणार नाही. कारण जे करण्यासारखं आहे ते हे लोक करतच नाहीये, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
जे करता येण्यासारखं आहे ते करत नाही म्हणून मी तो विषय बोललो. विचारपूर्वक बोललो. आणि हे खरचं आहे. महाराष्ट्रातील राजकारणाला सर्वांची गरज आहे. राजकारण एकाच पक्षाचं नसतं. राजकारणात अनेक पक्ष पाहिजे, विरोधक पाहिजे. सर्व पक्षाचे लोकं पाहिजे. त्यांच्या शुभेच्छा समजूया, असे फडणवीस म्हणाले.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!