banner 728x90

‘मी शिक्षकाचा मुलगा असून, मला संस्कार शिकवू नका’, पडळकरांचं ‘शरयू देशमुख’ हीला प्रत्युत्तर

banner 468x60

Share This:

सोलापूर : भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कन्या शरयू देशमुख यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. ‘मी एका शिक्षकाचा मुलगा आहे, त्यामुळे मला संस्कृतपणा शिकवू नका’ असं पलटवार पडळकर यांनी केला. सोलापूरमध्ये पत्रकारांशी बोलत असताना पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर पुन्हा एकदा टीकास्त्र केले. 

‘राज्यातील काही घराणे हे अतिसुसंस्कृत आहेत. मी एका शिक्षकाचा मुलगा आहे. तुमच्या विरोधात बोललो की लगेच असंस्कृतपणा दिसतो. त्यामुळे मला संस्कार शिकवण्याची गरज नाही’, असं म्हणत पडळकरांनी शरयू देशमुख यांना चांगलाच धडा शिकवला.
यासह पडळकरांनी महाविकास आघाडी सरकारचे किंगमेकर असलेले राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला. ‘साडेतीन जिल्ह्याच्या बाहेर त्यांची पार्टी नाही. काही जणांना वाटते की, कोबडं आरवल्याशिवाय उजाडत नाही. असेच काही कोंबडे दिल्लीत एकत्र जमले होते. त्यामुळे याचं असं झालंय की, रात गेली हिशेबात पोरगं नाही नशिबात, त्यामुळे पुढं कुठल्यातरी लवणात ससा सापडेल अशी अपेक्षा आहे, अशी बोचरी टीका पडळकर यांनी केली.
ओबीसींच्या आरक्षणाबाबत फडणवीस यांनी संन्यास घेण्याचे विधान केल्यानंतर भाजप आणि महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांत टीकाटिप्पणी सुरू झाली होती.त्या वादात गोपीचंद पडळकर यांनी उडी घेत ट्वीट करत ‘महसूल मंत्रीपदाच्या रस्सीखेचामुळे काही लोक भ्रमिष्टाप्रमाणे गांजा पिल्यासारखे बरळू लागले आहेत. मुळात देवेंद्र फडणवीसांचे लग्न विदर्भयात्रेच्या पाच वर्षाअगोदरच झाले आहे, याचेही भान यांना राहिले नाही.’ अशी टीका केली होती. त्यावर पडळकरांच्या या टीकेल्या थोरात यांची कन्या शरयू देशमुख यांनी ट्वीट करून जशास तसे उत्तर दिले. ‘पात्रतेपेक्षा जास्त मिळाले की असं होतं. आपल्या भाषेवरून आपल्या संस्कारांची ओळख होती. असो, ज्याचे त्याचे संस्कार..!’ असं म्हणत शरयू देशमुख यांनी पडळकरांना चांगलेच संस्काराचे धडे दिले.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!