मुंबई: राज्यात कोरोनाची दुसरी लाट आल्याने तसेच मुंबईतील वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव या पार्श्वभूमीवर मुंबईतील लोकल रेल्वे सर्वसामान्य जनतेसाठी बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात कमी झाला असून, मुंबई लोकल आता पुन्हा कधी सुरू होणार? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहे. याबाबत विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी मोठं स्पष्टीकरण दिलं आहे.
Home
पालघर
मुंबईतील लोकल सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री सकारात्मक; विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकरांचे वक्तव्य
मुंबईतील लोकल सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री सकारात्मक; विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकरांचे वक्तव्य
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुंबई लोकल सर्वसामान्य लोकांसाठी सुरू करण्यास सकारात्मक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबईतील लोकल सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरु करण्याबाबत प्रवीण दरेकर यांनी मागणी केली होती तसेच मागणी मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशाराही त्यांनी राज्य सरकारला दिला होता.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व प्रवीण दरेकर यांच्यात फोनवरून लोकल सुरू करण्याबाबत चर्चा झाली असून, मुख्यमंत्र्यांनी आपण मिळून यावर तोडगा काढू असं म्हणत, कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना प्रवास करण्यास परवानगी देता येऊ शकते का, याचा विचार करू शकतो असं म्हटलं आहे.
मुंबई लोकल बंद असल्याने सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याने लोकल सुरू करण्याबाबत राज्य सरकारमध्ये हालचाली सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. सरकार व विरोधी पक्ष मिळून यावर तोडगा काढू, असे मुख्यमंत्र्यांनी म्हणत मुंबई लोकल सुरू करण्याबाबत सकारात्मक असल्याचं मत व्यक्त केलं असल्याची माहिती प्रवीण दरेकर यांनी दिली आहे.
Recommendation for You

Post Views : 71 राज्यातील पालघर जिल्ह्यातील एका औषध (फार्मास्युटिकल) निर्मिती कारखान्यात आज सकाळी भीषण…

Post Views : 71 पालघर-योगेश चांदेकरआमदार राजेंद्र गावित यांनी मांडली होती लक्षवेधी पालघरः पालघर जिल्ह्यातील…

Post Views : 71 पालघर-योगेश चांदेकरखा. डॉ. हेमंत सवरा यांची माहितीअभियानाचा नागरिकांना फायदा होणार पालघरः…

Post Views : 71 पालघर-योगेश चांदेकर तलासरी व डहाणू तालुक्यातील जनता दरबारात तक्रारींचे जागीच निवारण…












