मुंबई: राज्यात कोरोनाची दुसरी लाट आल्याने तसेच मुंबईतील वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव या पार्श्वभूमीवर मुंबईतील लोकल रेल्वे सर्वसामान्य जनतेसाठी बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात कमी झाला असून, मुंबई लोकल आता पुन्हा कधी सुरू होणार? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहे. याबाबत विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी मोठं स्पष्टीकरण दिलं आहे.
Home
पालघर
मुंबईतील लोकल सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री सकारात्मक; विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकरांचे वक्तव्य
मुंबईतील लोकल सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री सकारात्मक; विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकरांचे वक्तव्य
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुंबई लोकल सर्वसामान्य लोकांसाठी सुरू करण्यास सकारात्मक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबईतील लोकल सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरु करण्याबाबत प्रवीण दरेकर यांनी मागणी केली होती तसेच मागणी मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशाराही त्यांनी राज्य सरकारला दिला होता.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व प्रवीण दरेकर यांच्यात फोनवरून लोकल सुरू करण्याबाबत चर्चा झाली असून, मुख्यमंत्र्यांनी आपण मिळून यावर तोडगा काढू असं म्हणत, कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना प्रवास करण्यास परवानगी देता येऊ शकते का, याचा विचार करू शकतो असं म्हटलं आहे.
मुंबई लोकल बंद असल्याने सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याने लोकल सुरू करण्याबाबत राज्य सरकारमध्ये हालचाली सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. सरकार व विरोधी पक्ष मिळून यावर तोडगा काढू, असे मुख्यमंत्र्यांनी म्हणत मुंबई लोकल सुरू करण्याबाबत सकारात्मक असल्याचं मत व्यक्त केलं असल्याची माहिती प्रवीण दरेकर यांनी दिली आहे.
Recommendation for You

Post Views : 108 पालघर-योगेश चांदेकर पालघर– शिक्षणाची गंगा केवळ शहरांच्या भिंतींपुरती मर्यादित न राहता…

Post Views : 108 पालघर-योगेश चांदेकर पालघर– वसई तालुक्यातील नामांकित सेवा विवेक संस्थेने आदिवासी महिला…

Post Views : 108 पालघर-योगेश चांदेकर पालघर: ‘रॉयल-सिट्रस कंपनी’तील गुंतवणूकदार सभासद आणि प्रतिनिधींना परतावा मिळवून…

शिरगाव मांगेलआळी परिवाराचा समाजोपयोगी उपक्रम; गणेश विसर्जनासाठी विनामूल्य होडीसेवा व मनुष्यबळ उपलब्ध
Post Views : 108 पालघर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत शिरगाव मांगेलआळी परिवारातर्फे गणेशमूर्ती…

Post Views : 108 पालघर-योगेश चांदेकर आसनगावच्या सूर्यवंशी क्षत्रिय कुणबी समाज गणेशोत्सव मंडळाचा देखावा पालघर:…












zzlWzi8qqy8Un4Ec/s320/1001506655.jpg