मुंबई : राज्यात डेल्टा प्लस विषाणूने डोके वर काढायला सुरुवात केली आहे. रुग्णांमध्ये आढळणाऱ्या या विषाणूची चाचणी करण्यासाठी मुंबईतुन थेट पुण्यातील प्रयोगशाळेत नमुने पाठवावे लागत आहे. व तेथून अहवाल येण्यासाठी किमान दिड ते दोन महिने लागत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. ही गैरसोय थांबवण्यासाठी पालिकेने चिंचपोकळीच्या कस्तुरबा रुग्णालयात डेल्टा प्लस विषाणूची चाचणी करण्याची तयारी केली आहे. त्यासाठी पालिका अमेरिकेहून साडेसहा कोटीचे अत्याधुनिक मशिन्स अवघ्या दोन आठवड्यात खरेदी करणार आहे. त्याद्वारे मुंबईकरांचे चाचणी अहवाल अगदी जलदरीत्या म्हणजेच दोन ते तीन दिवसात मिळू शकणार आहे. मुंबई कोरोनाची दुसरी लाट ओसरली असून, संसर्गाचा प्रमाण नियंत्रणात आला आहे. मात्र डेल्टा प्लसने पुन्हा एकदा मुंबईवर संकट ओढावले आहे. आतापर्यंत पालिकेला संशयित 600 रुग्णाचे अहवाल मिळाले आहे. डेल्टाचा संसर्ग झालेला आतापर्यंत केवळ एक रुग्ण सापडला असून तोही उपचार करून बरा झाला आहे.मात्र खबरदारी म्हणून पालिका अशा प्रकारची वेगवेगळ्या विषाणूंची चाचणी करण्यासाठी यंत्रणा उभी करत आहे.
मुंबईत डेल्टा प्लस चाचणी अहवाल मिळणार केवळ दोन दिवसांत
डेल्टा प्लससह अशाच प्रकारच्या वेगळ्या विषाणूच्या चाचण्या करण्यासाठी कस्तुरबा रुग्णालयात अत्याधुनिक मशीन आणली जात आहे. त्यामुळे अवघ्या दोन तीन दिवसांत अहवाल मिळू शकणार आहे. त्यामुळे बाधित रुग्णांचे निदान आणि लवकर झाल्यास खबरदारी आणि उपचार करणे सोपे होईल. असे अतिरिक्त पालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले आहे.
Recommendation for You

Post Views : 28 सोनोपंत दांडेकर महाविद्यालय, पालघर येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे (YCMOU)…

Post Views : 28 मासेमारी बंदी कालावधी संपल्यानंतर १ ऑगस्ट पासून मासेमारीसाठी गेलेल्या बोटी जिल्ह्याच्या…

Post Views : 28 पालघर-योगेश चांदेकर पालघरः पाम ग्रामपंचायतीच्या सरपंच दर्शना दत्तात्रय पिंपळे यांच्या विरोधात…

Post Views : 28 पालघर-योगेश चांदेकर शिक्षणाच्या प्रवाहात कातकरी समाजाला आणण्यासाठी विशेष उपक्रम पालघरः पालघर…