banner 728x90

मोठी बातमी! डहाणू तालुक्यात फटाका कंपनीत मोठा स्फोट

banner 468x60

Share This:

पालघर : योगेश चांदेकर– पालघरच्या डहाणू तालुक्यातील डेहणेपळे येथे एका फटाके बनवणाऱ्या कंपनीत मोठा स्फोट झाला आहे. स्फोट इतका भयंकर होता की आजूबाजूची गावेही मोठ्या प्रमाणात हादरलेत. या स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की,सुमारे  5 ते 10 किलोमीटर आजूबाजूच्या घरांना मोठे धक्के जाणवले. 

मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीत वेल्डिंगचं काम सुरू होतं, त्याचदरम्यान आग लागण्याने हा स्फोट झाला आहे. कंपनीत मोठ्या प्रमाणात कामगार अडकले असून, त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. सध्या तरी कोणतीही जीवितहानी झाली नसून, 10 जण जखमी झाले आहे. जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय डहाणू व सेवा नर्सिंग होम येथे दाखल करण्यात आले आहे.अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहे. आणि बचावकार्य सुरू झाले आहे.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!