banner 728x90

मोठी बातमी! मुंबईत शिक्षकांना लोकलमधून प्रवास करता येणार; ठाकरे सरकारची मोठी घोषणा

banner 468x60

Share This:

मुंबई : राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या नियंत्रणात आली असली तरी धोका काही टळलेला नाही. कोरोनामुळे मुंबईत लोकलमध्ये सर्वसामान्यांना प्रवासावर बंदी घालण्यात आली आहे. त्यात विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून राज्यसरकारने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र मूल्यमापनाची प्रक्रिया सुरू झालेली नव्हती. त्यामुळे अखेर मूल्यमापनाची प्रक्रिया लवकरात लकवर पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने शिक्षकांना लोकलमधून प्रवास करण्याची मुभा दिली आहे. इयत्ता दहावीच्या मूल्यमापनाशी संबंधित मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना रेल्वेप्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. याबाबत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत मुख्यमंत्री कार्यालयाकडे अर्ज पाठविला होता. सदर प्रस्तावास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे.

इयत्ता दहावीचा निकाल वेळेत घोषित करण्यासाठी विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करणे आवश्यक आहे. मूल्यांकन करून विद्यार्थिनिहाय माहिती राज्य मंडळाकडे पाठवणे, श्रेणी तक्ता तयार करणे, इत्यादी कामे करण्यासाठी शिक्षकांना शाळेत उपस्थित राहणे गरजेचे आहे. त्यासाठी शालेय शिक्षण विभागाने शिक्षकांना रेल्वेप्रवासाची परवानगी देण्याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवला होता. शालेय शिक्षण विभागाच्या प्रस्तावाचे गांभीर्य व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दहावी मूल्यमापनाशी संबंधित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना उपनगरीय रेल्वेप्रवासाची मुभा दिली आहे. या निर्णयामुळे दहावी निकाल वेळेत लागण्यास मदत होईल. तसेच पुढील शिक्षणासाठी विविध शाखांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना यामुळे फायदा होईल.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!