banner 728x90

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील 10 दिवस मराठवाडा दौऱ्यावर

banner 468x60

Share This:

औरंगाबाद : सलमान शेख- राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील दहा दिवस मराठवाडा दौऱ्यावर येत आहे. येणाऱ्या विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका शिवसेनेला सोबत घेऊन लढणार असल्याचे नुकतेच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी जाहीर केले होते. त्यापार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील मराठवाड्याच्या दौऱ्यावर येत आहे. कोणत्या मतदार संघात राष्ट्रवादी पक्षाची ताकत आहे. येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणूकित शिवसेनेला कोणकोणत्या जागा सोडाव्या लागतील. याची चाचपणी पाटील करणार आहे. 

2014 आणि 2019 या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला मराठवाड्यात अपेक्षित यश मिळाले नव्हते. तसेच जिल्हा परिषदेतही वर्चस्व सिद्ध करता आले नाही. त्यामुळे आता पवारांनी शिवसेनेसोबत निवडणुकीत उतरण्याचा नारा दिला आहे. मात्र सत्तेत असलेले महाविकास आघाडी सरकार मधील काँग्रेस पक्ष यंदाच्या निवडणुकीत स्वबळावर उतरण्याचा नारा देत आहे. हे लक्षात घेता राष्ट्रवादीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे म्हणणे जाणून घेण्यासाठी 24 जूनपासून राष्ट्रवादी पक्षाकडून परिवार संवाद यात्रा सुरू होत आहे. यात राष्ट्रवादीच्या पदरात अपयश का आले यावर चिंतन केले जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी होऊ नये यासाठी फक्त 150 जणांची पदाधिकाऱ्यांनाच आमंत्रित करण्यात आले आहे.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!