मुंबई : येत्या ५ जुलैपासून राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची सुरुवात होणार आहे. विधानसभा अध्यक्षाची निवड व्हावी यासाठी काँग्रेस पक्ष आग्रही असला, तरी आघाडीत अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत मतभिन्नता असल्याचे बुधवारी स्पष्ट झाले.
विधानसभा अध्यक्षपदाचा तोडगा निघेना; आघाडीच्या नेत्यांची ‘वर्षा’ वर बैठक
बुधवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समवेत आघाडीच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत विधानसभा अध्यक्ष निवडीवरून विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे समजते. सध्या कोरोनाचे संकट कायम असून, यंदाचे पावसाळी अधिवेशन दोनच दिवसात गुंडाळण्याचा निर्णय आघाडी सरकारने घेतला आहे. अधिवेशनाआधी आमदारांची कोरोना चाचणी होणार आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांची निवड पुढे ढकलता येईल किंवा कसे? यावरही बैठकीत खल झाला
मुंबईत होणाऱ्या दोन दिवसांच्या पावसाळी अधिवेशनात नवीन विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होईल, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले आहे. त्याच वेळी विधानसभा अध्यक्षपद हे काँग्रेसलाच मिळणार असेही त्यांनी स्पष्ट केले. माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद स्वीकारल्यानंतर 2020च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर अद्यापही अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात आलेली नाही.
पावसाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षाची निवडणूक व्हावी, असे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सूचना दिल्या आहेत. तथापि, राज्यपालांना 12 नामनिर्देश आमदारांबाबत दिलेल्या पत्राचे काय झाले? असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. या पदावरील व्यक्तींनी पदाचा सन्मान राखणे गरजेचे आहे. मात्र, राज्यपालांना त्याचा विसर पडला आहे, अशी टीका पटोले यांनी केली आहे.
Recommendation for You

Post Views : 77 राज्यातील पालघर जिल्ह्यातील एका औषध (फार्मास्युटिकल) निर्मिती कारखान्यात आज सकाळी भीषण…

Post Views : 77 पालघर-योगेश चांदेकरआमदार राजेंद्र गावित यांनी मांडली होती लक्षवेधी पालघरः पालघर जिल्ह्यातील…

Post Views : 77 पालघर-योगेश चांदेकरखा. डॉ. हेमंत सवरा यांची माहितीअभियानाचा नागरिकांना फायदा होणार पालघरः…

Post Views : 77 पालघर-योगेश चांदेकर तलासरी व डहाणू तालुक्यातील जनता दरबारात तक्रारींचे जागीच निवारण…












