banner 728x90

विनामास्क फिरणाऱ्याला पोलिसांनी हटकले; संतापाच्या भरात पोलिसांवरच केला हल्ला

banner 468x60

Share This:

औरंगाबाद : सलमान शेख –  राज्यात कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा आणि डेल्टा प्लस या विषाणूचा धोका लक्षात घेता राज्य सरकारने राज्यातील सर्वच जिल्ह्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. मात्र, असे असतानाही अनेकजण उघडपणे शासनाच्या नियमांचे उल्लंघन करताना दिसत आहेत. औरंगाबादमध्ये पोलिसांच्या नाकाबंदी दरम्यान विनामास्क फिरणाऱ्या एकाला पोलिसांनी थांबवले. यावेळी या तरुणाने आपण एनएसजी कमांडो असल्याचं सांगत पोलिसांसोबत वाद घातला. एवढेच नाही तर पोलिसांवर मारहाण सुद्धा केली. यादरम्यान एका पोलीस कर्मचाऱ्याला संबंधित युवकाने चावा सुद्धा घेतला.

शहरातील छावणी परिसरातील नगरनाक्यावर नाकाबंदी दरम्यान विनामास्क फिरणाऱ्या या कमांडोची गाडी  पोलिसांनी थांबवली. गाडी अडवून पोलिसांनी त्याला  दंडाची पावती घेण्याबाबत सूचना करताच त्याने दोन जमादारांना मारहाण करण्यास सुरुवात केली. या घटनेत तीन पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. हा प्रकार पाहताच मध्यस्थीसाठी गेलेल्या सहायक पोलीस निरीक्षकांना या कमांडोने फायटरने मारहाण करुन डोके फोडले.
या हल्ल्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग भागीले, जमादार श्रीधर टाक आणि किशोर घोडेले हे जखमी झाले. औरंगाबादेतील घाटी रुग्णालयात या तिघा पोलीस कर्मचाऱ्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!