banner 728x90

विराज कंपनीकडून लोकांच्या जीवाशी खेळ सुरूच, प्रदूषित राख आणि स्लजमुळे हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात

banner 468x60

Share This:

बोईसर : योगेश चांदेकर – तारापूर एमआयडीसीतील विराज कंपनीच्या प्रदूषित राख आणि स्लजच्या डोंगरांमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. ग्रामस्थांनी राखेच्या साठ्या प्रकरणी शिवसेना शहर प्रमुख मुकेश पाटील यांच्यावर आरोप केला आहे. तसेच विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात बेटेगावचे उपसरपंच देखील संगनमताने असू शकतात.

तारापूर एमआयडीसीतील विराज स्टील आणि विराज प्रोफाईल या कंपनीत लोखंडावर प्रक्रिया केली जाते. यादरम्यान निघालेली राख व स्लज बोईसर पूर्वेकडील नागरी वस्ती असलेल्या बेटेगावकडे सोडण्यात येते. बेटेगाव हद्दीतील 25 एकर जागेवर प्रदूषण मंडळामार्फत घेतलेल्या परवानगीमधील अटी व शर्तीचा भंग करून, 25 एकरमध्ये 40 ते 50 फुट उंचीचे मोठे डोंगर तयार झाले आहेत. त्यात मानवी आयोग्यसाठी घातक असलेल्या प्रदूषित राख व स्लगचा लाखो टन घनकचरा साठवून ठेवण्यात आला आहे. 
गेल्या काही दिवसांपासून या राखेच्या डोंगराला वारंवार आगी लागण्याच्या घटना घडत आहे. त्यातून तयार होणार्‍या घातक धूराच्या लोटामुळे सभोवतालच्या बेटेगाव, मान, वारांगडे गावातील नागरिकांचे जीव धोक्यात सापडले असून, या प्रदूषणामुळे अनेक आजार उदभवत आहेत.
लोखंडावर प्रक्रिया करतांना विराज कंपनीतून मोठ्या प्रमाणात प्रदूषित राख व स्लज बेटेगाव ग्रामपंचायत हद्दीतील सर्व्हे क्र. 158/1/64 मधील 25 एकर जागेवर टाकण्यात येते. बोईसर येथील शिवसेना पक्षाचा पदाधिकारी मुकेश पाटील व त्यांचे सहकारी यांच्याकडून या जागेवर प्रदूषित राख आणि स्लज साठवणूक करण्यात येत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. तसेच  
आदिवासी पाड्याजवळ करण्यात येणार्‍या या प्रदूषित राखेच्या साठवणुकीसाठी कंपनीने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून घेतलेल्या परवानगीच्या अटी व शर्तीचा भंग केला असून, संबंधित हद्दीतील बेटेगाव ग्रामपंचायतीकडून कोणत्याही प्रकारे परवानगी घेतली नसल्याचा आरोप स्थानिक गावकर्‍यांनी केला आहे. त्यामुळे विराज कंपनीसह संबंधित शिवसेनेचा पदाधिकारी मुकेश पाटील व बेटेगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच यांच्यावर चौकशी करून कारवाई करावी. जर चौकशी झाली नाही तर, आम्ही विराज कंपनी बंद पडू असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.  

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!