मुंबई : भाजपचे जेष्ठ नेते व खासदार नारायण राणे यांना मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राणेंच्या कार्यकर्त्यांनी कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात जल्लोष केला आहे. राणेंची मंत्रिपदी वर्णी लागल्यावर निलेश राणे यांनी पहिली प्रतिक्रिया देताना शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
Home
पालघर
'शिवसेनेला आम्ही किंमत देत नाही, जे मिळालं त्यात समाधानी'; मंत्रिमंडळ विस्तारानंतर निलेश राणेंचे शिवसेनेवर टीकास्त्र
‘शिवसेनेला आम्ही किंमत देत नाही, जे मिळालं त्यात समाधानी’; मंत्रिमंडळ विस्तारानंतर निलेश राणेंचे शिवसेनेवर टीकास्त्र
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राणे साहेबांवर मोठी जबाबदारी टाकली आहे. ज्या-ज्या वेळी त्यांच्यावर एखादी जबाबदारी टाकण्यात आली त्यावेळी त्यांनी ती पूर्ण करण्याचं काम केलं आहे. आज त्यांनी केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतली आहे याचा आम्हाला आनंद असल्याचं निलेश राणे म्हणाले. यावेळी त्यांना पत्रकारांनी शिवसेनेच्या विरोधात राणे यांना प्रमुख अस्त्र म्हणून वापरलं जाईल?, असा सवाल केला.
यावर प्रतिक्रिया देतांना, केंद्रीय मंत्रिपद ही एक मोठी जबाबदारी आहे. तुम्ही त्याचा राजकीय अर्थ लावत असाल. पण साहेबांन देण्यात आलेली जबाबदारी मोठी आहे. नगरसेवक ते केंद्रीय मंत्री हा प्रवास मोठा आहे, सोपा नक्कीच नाही. हे येरागबाळ्याचं काम नाही. उरला प्रश्न शिवसेनेचा तर त्यांना आम्ही किंमत देत नाही. जे मिळालं त्यात आम्ही समाधानी असल्याचं म्हणत राणेंनी शिवसेनेवर निशाणा साधला. याआधी निलेश राणेंचे बंधू नितेश राणेंनी प्रतिक्रिया देताना काँग्रेसवर निशाणा साधला.
दरम्यान, मी याचं श्रेय भाजपच्या नेतृत्वाला देईल, जे काँग्रेसला बारा वर्षे समजलं नाही. ते भाजपच्या नेतृत्वाला कळलं की, राणेंची किंमत काय आहे. त्यांचं वजन काय आहे. त्यांचा अभ्यास आणि अनुभव काय आहे. काँग्रेसनं वारंवार राणेंना शब्द देऊनही तो पूर्ण केला नाही. पण अवघ्या दीड वर्षात भाजपनं मला आमदार केल्याचं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.
Recommendation for You

Post Views : 53 पालघर- वसई-विरार चे प्रथम महापौर, ज्येष्ठ समाजसेवक, उद्योजक, ख्यातनाम बांधकाम व्यावसायिक…

Post Views : 53 पालघर-योगेश चांदेकर पालघरः पालघर जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपचे जिल्हाध्यक्ष…

Post Views : 53 पालघर-योगेश चांदेकर पालघरः डहाणू नगरपालिकेच्या नगराध्यक्ष आणि २७ नगरसेवकांच्या निवडणुकीसाठी भारतीय…

Post Views : 53 जिल्ह्यात सुरू असलेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकीदरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी पालघर…












