banner 728x90

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थानापूर्वीच आळंदीत, 20 वारकरी कोरोना पॉझिटिव्ह

banner 468x60

Share This:

आळंदी : आषाढी वारीसाठी कोरोनाच्या संभाव्य तिसरी लाट आणि डेल्टा प्लस विषाणूच्या पार्श्वभूमीवर कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी गर्दी न करण्याचं आवाहन करण्यात आले आहे. वारीला सुरुवात होत असतानाच आता कोरोनानं वारीत शिरकाव केल्याची माहिती मिळाली आहे. माऊलीच्या प्रस्थान सोहळ्यासाठी निवडण्यात आलेल्या 100 वारकऱ्यांपैकी 2 जणांना कोरोनाची लागण झाली. ही माहिती मिळताच काहीसं गोंधळाचं वातावरण झालं आहे. तर दर्शनासाठी आलेल्या लोकांपैकी 20 जणांचेही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. 

50 लोकांना माऊलीच्या दर्शनासाठी परवानगी टप्प्या टप्प्यानं देण्यात आली होती. त्यानंतर कोरोना चाचणी करण्यात आली. यापैकी 164 जणांचे रिपोर्ट आले असून 20 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. उद्या माऊलीचं प्रस्थान दुपारी होण्याची शक्यता असतानाच आता वारकऱ्यांची चिंता वाढली आहे. विठुरायाच्या भेटीसाठी तुकोबारायांचा पालखी प्रस्थान सोहळा सुरू झाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रस्थान सोहळ्यासाठी केवळ वारकऱ्यांनाच परवानगी देण्यात आली आहे. 
 

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!