पुणे : महाविकास आघाडी सरकारमध्ये पुन्हा एकदा नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची कामं करत नसल्याचा गंभीर आरोप केला.
Home
पालघर
'समझोताच करायचा नसेल, सोबत राहून पाठीवर सुराच खुपसायचा असेल तर..; नाना पटोलेंची महाविकास आघाडी सरकारवर नाराजी
‘समझोताच करायचा नसेल, सोबत राहून पाठीवर सुराच खुपसायचा असेल तर..; नाना पटोलेंची महाविकास आघाडी सरकारवर नाराजी
पालकमंत्री काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं काम करत नाहीत. ते नेहमी बारामतीत असतात. आपण म्हणतो काँग्रेसच्या संपर्कमंत्र्यांनी लक्ष घालावं, पण आपल्या संपर्कमंत्र्यांचं ऐकायचं की नाही ते तेच ठरवतात. कारण त्यासाठी त्यांचीच सही लागते. कुठल्याही समित्यांवर नावं पाठवायची असतील तर त्याला संपर्कमंत्र्यांची सही चालत नाही. त्यासाठी पालकमंत्र्यांचीच सही लागते. हा त्रासालाच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आपली ताकद बनवावी, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलंय. ते लोणावळ्यात कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.
स्वबळाबाबत मी जे बोललो त्यात मी माघार घेणार नाही. त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आपल्या कामाला लागावं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या शिवसैनिकांना कामाला लागा असं सांगितलं. म्हणजे मी स्वबळावर लढण्याबाबत बोलत होतो तर त्रास होत होता आणि आता ते बोलले तर ते ठीक आहे, काही नाही, असं नाना पटोले म्हणाले.
ज्या लोकांना समझोताच करायचा नसेल, सोबत राहून पाठीवर सुराच खुपसायचा असेल तर आपल्याला काहीच बोलायचं नाही. त्या रागालाच आपण आपली ताकद बनवली पाहिजे, असा संदेश नाना पटोले यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना दिला आहे.
Recommendation for You

Post Views : 47 पालघर- वसई-विरार चे प्रथम महापौर, ज्येष्ठ समाजसेवक, उद्योजक, ख्यातनाम बांधकाम व्यावसायिक…

Post Views : 47 पालघर-योगेश चांदेकर पालघरः पालघर जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपचे जिल्हाध्यक्ष…

Post Views : 47 पालघर-योगेश चांदेकर पालघरः डहाणू नगरपालिकेच्या नगराध्यक्ष आणि २७ नगरसेवकांच्या निवडणुकीसाठी भारतीय…

Post Views : 47 जिल्ह्यात सुरू असलेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकीदरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी पालघर…












